Menu Close

वाल्मीकि ऋषींवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने राखी सावंत यांना पंजाब पोलिसांकडून अटक

मुंबई : एका खाजगी दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमात वाल्मीकि ऋषींविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणी हिंदी चित्रपट अभिनेत्री राखी सावंत यांना पंजाब पोलिसांनी येथे ४ एप्रिलला अटक केली आहे. लुधियानातील (पंजाब) न्यायालयाने समन्स बजावूनही सावंत या उपस्थित न राहिल्याने त्यांच्या विरोधात ९ मार्च या दिवशी अटकेचा आदेश दिला होता. राखी सावंत यांनी केलेल्या वक्तव्याने वाल्मीकि समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याने त्यांनी सावंत यांच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली. (वाल्मीकि समाजाची अभिनंदनीय कृती ! असे केल्यास हिंदु धर्मियांच्या श्रद्धास्थानांविरोधात ‘ब्र’ही कोणी उच्चारणार नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणाची पुढील सुनावणी १० एप्रिलला होणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *