वाराणसी : हिंदु जनजागृती समितीद्वारे रामनवमी निमित्त येथील गोरक्षनाथ मंदिर ते चित्तरंजन पार्क या मार्गावर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या आधी धर्मध्वज आणि श्रीरामाची प्रतिमा यांचे पूजन करण्यात आले. यात सहभागी झालेल्या धर्माभिमान्यांनी हातात भगवे ध्वज आणि सुवचनांचे फलक धरले होते. तसेच त्यांच्याकडून प्रभू श्रीरामचंद्रांविषयी घोषणा देण्यात येत होत्या. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना, हीच धर्मसंस्थापना आहे आणि हीच रामराज्याची स्थापना आहे’, असा संदेश या मिरवणुकीतून देण्यात आला.
उपस्थित मान्यवर आणि संघटना
हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, अरुणकुमार मौर्या, सूरज यादव, चमाव ग्राम प्रधान श्री. जयप्रकाश सिंह, या मान्यवरांसह हिंदु युवा वाहिनी, हिंदु जागरण मंच, भारत विकास परिषद, विश्व नारी अभ्युदय, साई राज स्पोर्टिंग क्लब- शिवपूर, स्वागतम् काशी फाउंडेशन, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी संघटना आणि धर्माभिमानी सहभागी झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
Sab ek doosry ko ilzaam dete rahte haen. Kya ham aor tum ne apne garibaan meyn jhanka hae ke kiski ghalti hae? Sirf afwahaon par dhiyaan dete haen! Asliyat Janna nahi chahte? Kyon?