मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीचा हा दुष्परिणाम होय ! या शिक्षणपद्धतीमुळे भारतियांना स्वतःच्या पूर्वजांनी केलेल्या महान कार्याचा विसर पडल्याने त्यांच्यात न्यूनगंड निर्माण झाला आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बडोदा (गुजरात) : येथील सयाजीराव गायकवाड विद्यापिठाच्या वार्षिक दिनदर्शिकेत भारतीय ऋषिमुनींना रॉकेट, विमान, कॉस्मेटिक सर्जरी आणि अणूतंत्रज्ञान यांचे जनक संबोधल्याने विद्यापीठ तसेच भारत यांची जगात मानहानी होईल, असे भारतीय वंशाचे नोबेल पुरस्कार विजेते वेंकटरामन् रामकृष्णन् यांनी म्हटले आहे. (स्वतःचा जो गौरवशाली इतिहास आहे, तो जगाला सांगण्यात लाज कसली ? वरील सर्व शास्त्रे सहस्रों वर्षांपूर्वी भारतात विकसित होती. हिंदूंच्या अनेक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे ! जागतिक व्यासपिठावर हे आत्मविश्वासपूर्ण आणि पूर्ण दाखल्यांसहित मांडल्यास भारताची मानहानी होणार नसून उलट जगात भारताची मान उंचावेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) वेंकटरामन् रामकृष्णन् यांना वर्ष २००९ मध्ये रसायनशास्त्राचा नोबेल मिळाला आहे. ते सध्या युनायटेड किंग्डम येथे वास्तव्य करत आहेत. (रामकृष्णन् इंग्रजाळलेले असल्यामुळेच ते अशी वक्तव्ये करत नसतील ना ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
इंडियन एक्सप्रेसने ९ मार्च या दिवशी सयाजीराव गायकवाड विद्यापिठाच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशनाची बातमी प्रकाशित केली होती. या दिनदर्शिकेत ९ भारतीय ऋषि-मुनींनी लावलेल्या विविध वैज्ञानिक शोधांची माहिती देण्यात आली होती. याविषयी इंडियन एक्सप्रेसने शास्त्रज्ञ वेंकटरमन् रामकृष्णन् यांचे मत जाणून घेतले. आपले मत नोंदवतांना वेंकटरमन् म्हणाले, ‘‘अणूतंत्रज्ञान, विमान आणि कॉस्मेटिक सर्जरी यांसारख्या आधुनिक शोधाचे श्रेय धार्मिक ग्रंथांमध्ये वर्णन करण्यात आलेल्या लोकांना देणे निराशाजनक आहे. (जे आहे, ते सांगणे हे निराशाजनक कसे ? महानतम् अशा हिंदु संस्कृतीची महती जगाला ज्ञात होत आहे. अनेक शास्त्रज्ञ ते मानतात ! गॉड पार्टिकलचा शोध घेत असलेल्या शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत नटराजाची मूर्ती बसवली आहे ! जे जगाला पटते, ते रामकृष्णन् यांना का पटत नाही कि त्यांना ते पटवून घ्यायचे नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ज्यांनी हे काम केले (याचे श्रेय ऋषिमुनींना दिले), त्यांना ते देशभक्तीचे काम करत असल्याचे वाटत असेल; मात्र यामुळे विद्यापीठ आणि भारत यांची मानहानी होते. अशा गोष्टी सार्वजनिक करण्यापूर्वी आपल्याकडे त्यासंबंधी ठोस पुरावे असणे आवश्यक आहे, तसेच आपण याविषयी जे लिहिणार आहोत, ते विज्ञानाच्या आधारे सिद्ध करता आले पाहिजे.’’ (याचे बरेच दाखले धर्मग्रंथांमध्ये आढळतात; मात्र त्यांतील काही पाने, लिखाण काळाच्या ओघात नाहीसे झाले. असे असतांना दाखलेच नाहीत, असे कसे म्हणता येईल ? रामकृष्णन् स्वतः शास्त्रज्ञ असतांना ते याविषयी संशोधन करण्यासाठी पुढाकार का घेत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
हिंदूंनो, भारताला गतवैभव प्राप्त होण्यासाठी साधना करा !
‘सुश्रुत संहिता’ या ग्रंथात ३०० शल्यचिकित्सा, अस्थीभंगांवरील उपचार आणि प्लास्टिक सर्जरी यांविषयी माहिती दिली आहे. बधिरीकरण, मेंदूची शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती यांचे सुश्रुत हे आद्यप्रणेते होत. हिंदुस्थानेतर सर्व जगाचे जनजीवन रानटी अवस्थेत असतांना ते १२५ प्रकारची उपकरणे शस्त्रक्रियेसाठी वापरत !
पाश्चात्त्यांनाही थक्क करणारे वैज्ञानिक संशोधन ऋषिमुनी साधनेच्या बळावर करू शकले. भारताला गतवैभव प्राप्त होण्यासाठी तुम्हीही साधना करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात