कुठे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे तक्रार नोंदवणारे ख्रिस्ती संपादक, तर कुठे अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली अशा घटनांकडे दुर्लक्ष करणारे निधर्मी वृत्तपत्रांचे हिंदु संपादक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पणजी : भगवान श्रीकृष्णाच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे प्रशांत भूषण यांच्यावर कडक कारवाई करण्याविषयी ‘गोवा क्रोनिकल’ दैनिकाचे संपादक साविओ रॉड्रीग्स यांनी ४ एप्रिल या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
ख्रिस्ती असण्यासह मी भारतीय आहे. भूषण यांनी खालच्या पातळीवर जाऊन हिंदूंच्या विरोधात असा प्रकार केल्यामुळे मी दुःखी झालो आहे. सामाजिक विषयावरील चर्चेत अनावश्यक धार्मिक गोष्टींना मधे आणणे चुकीचे आहे. हे अभिव्यक्तीस्वातंत्र नव्हे, तर जाणीवपूर्वक धार्मिक तेढ उत्पन्न करण्याचा प्रकार आहे. ख्रिस्ती असूनही अन्य धर्माचा मला आदर आहे. हिंदूंच्या भावना दुखावण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे धार्मिक भावना दुखावणे आणि अन्य गुन्ह्यांसाठी १२४, १५३ अ, २९५ अ, आदी कलमांखाली तक्रार नोंद करून भूषण यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी साविओ यांनी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात