Menu Close

वाराणसी (उत्तरप्रदेश) आणि हरोहळ्ळी (कर्नाटक) येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन

हरोहळ्ळी (बेंगळुरू) येथील पशूवधगृहाचे बांधकाम त्वरित थांबवण्याची हिंदुत्वनिष्ठांची मागणी

मंगळुरू : हरोहळ्ळी (बेंगळुरू) येथे सरकारच्या वतीने उभारण्यात येत असलेले पशूवधगृहाचे बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे, कर्नाटक सरकारने पीएचडी आणि एमफिल करणार्‍या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना प्रतिमास प्रत्येकी २५ सहस्र रुपये देण्याचा निर्णय रहित करावा, माले महादेश्‍वर टेकडीवर गायींना चरण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यावी या मागण्यांसाठी येथील उपायुक्त कार्यालयासमोर अलीकडे हिंदुत्वनिष्ठांनी राष्ट्रीय हिंदु आंदोलन केले आणि उपायुक्तांना निवेदन सादर केले.

या वेळी धर्माभिमान्यांना संबोधित करतांना हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण कन्नडचे समन्वयक श्री. चंद्रू मोगेर म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी भारतातील शेती बंद करण्यासाठी पशूवधगृह उभारले; मात्र स्वातंत्र्यानंतर ती पशूवधगृहे बंद न करता नवी ‘हाय-टेक’ पशूवधगृहे उभारली जात आहेत. हरोहळ्ळी येथे उभारण्यात येणार्‍या पशूवधगृहासाठी ३६ एकर भूमी आणि ६४ कोटी रुपयांचे अनुदान सरकारने रहित करावे. अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन बंद करावे, जंगलाच्या सुरक्षेच्या कारणावरून माले महादेश्‍वर टेकडीवर गायींचे बंद केलेले चरणक्षेत्र पुन्हा उपलब्ध करून द्यावे.’’

या आंदोलनाला समितीचे श्री. अनंत कामत, हिंदूसंघटक श्री. उदय शंकर, श्री. सतीश, श्री. मंजुनाथ, रणरागिणी शाखेच्या सौ. लक्ष्मी पै, सनातन संस्थेचे श्री. विनय गौडा आदी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *