‘अनुमाने ३ सहस्र वर्षांपूर्वी भगवान परशुरामांनी शोधलेल्या युद्धकला आजही केरळमध्ये अस्तित्वात आहेत. हाँगकाँगचे प्रसिद्ध वृत्तपत्र ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने त्याच्या लेखात ‘नॉट जस्ट किक्स’ (‘केवळ ‘किक्स’ (कराटे युद्धकलेतील पायाने मारावयाचा मार) नव्हेत’) या ९ नोव्हेंबर २००७ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात डेव्हिड मॉमफर्डने लिहिले, ‘शावलीन (कुंग फू शिकवणारी चीनमधील मंदिरे) कुंग फू’ची पाळेमुळे बोधीधर्म नावाच्या बुद्ध साधूच्या शिकवणुकीत आहेत. तो इ.स. ५२७ पूर्वी येथील मंदिरांमध्ये आला होता. शरीर आणि मन यांची क्षमता वाढवण्यासाठी आणि ध्यानासाठी सिद्ध केलेला योगही त्याने येथे शिकवला. ‘कुंग फू’ चा सराव करणार्यांना त्यांचे मूळ भारत असल्याचे लक्षात आले. जपानचे ‘कराटे’ आणि कोरियाचे ‘तायक्वांडो’ यांच्यावर चीनच्या ‘कुंग फू’चा प्रभाव आहे. याचा अर्थ भारत हेच या तीनही युद्धकलांचे माहेरघर आहे.’
(त्रैमासिक संदेशभारती, जानेवारी-मार्च २००८)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात