याविषयी प्रसिद्धीलोलुप आंदोलने करणार्या तृप्ती देसाई आणि त्यांची संघटना तोंड उघडणार नाही, तसेच पुरोगामीही मुसलमानांच्या विरोधात बोलणार नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
देवबंद (उत्तरप्रदेश) : देवबंदचे मौलाना आणि तंजीम उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष नदीम उल् वाजदी यांनी ‘महिलांनी सरकारी किंवा बिगर सरकारी नोकरी करू नये. असे करणे इस्लामच्या विरुद्ध आहे’, असा फतवा काढला आहे.
वाजदी म्हणाले की, घरखर्चासाठी पैसे कमवण्याचे दायित्व पुरुषाचे आहे. पत्नीने घर आणि मुले यांची देखभाल करावी. महिलांनी तेव्हाच काम करावे, जेव्हा पैसे कमवणारा एकही पुरुष घरात नसेल. काम करतांना तिने चेहरा झाकला पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात