मुसलमानही गोहत्याबंदीच्या बाजूने असतील, तर पूर्ण देशात गोहत्याबंदी लागू करण्यास शासनाने पावले उचलणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
लक्ष्मणपुरी – ५ एप्रिलला ऑल इंडिया शिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या कार्यकारिणीची बैठक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत देशात गोहत्याबंदी करणे योग्य असल्याचे म्हटले गेले. तसेच ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राममंदिराचा प्रश्न चर्चेने सोडवावा’, असे म्हटले गेले. तीन तलाकवर बंदी घालण्याच्या सरकारच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले. याच वेळेत शिया मुसलमानांना अल्पसंख्यांकांच्या कोट्यातून स्वतंत्र अधिकार देण्याची मागणी करण्यात आली. (या देशात मुसलमानांना ‘इतरांपेक्षा त्यांना स्वतंत्र अधिकार असावेत’, असे का वाटते ? स्वतःचा वेगळेपणा जपण्याची मुसलमानांची ही वृत्ती समाजहितासाठी घातक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तसेच सच्चर आयोगाप्रमाणेच शिया मुसलमानांच्या शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण करण्याचीही मागणी करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात