Menu Close

उत्तरप्रदेशातील मदरशात धर्मांध शिक्षकांकडून विधवेवर सामूहिक बलात्कार

समाजाला सर्वप्रथम बातमी देण्यात आम्हीच नंबर वन असल्याचे छातीठोकपणे सांगणारी प्रसारमाध्यमे मदरशात बलात्कार झाल्याची बातमी का दाखवत नाहीत ? हिंदूंचे संत, मठ आणि आश्रम यांच्या विरोधात कथित आरोप करणारी ही प्रसारमाध्यमे वासनांध धर्मांधांच्या विरोधात मूग गिळून का बसतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

आंबेडकरनगर (उत्तरप्रदेश) : येथील एका मदरशात स्वयंपाकी म्हणून काम करणार्‍या एका विधवा महिलेने तिच्यावर मदरशातील तीन धर्मांध शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पीडितेने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे. अधीक्षकांनी पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. (मदरशात आतंकवादी निर्माण होण्यासह महिला आणि मुली यांच्यावर बलात्कार होण्याचीही प्रकरणे पुढे येत आहेत. असे असतांना अशा मदरशांवर सरकार कारवाई का करत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

माहितीनुसार आंबेडकरनगर जिल्ह्यातील मालीपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात रहाणार्‍या पीडितेला दोन मुले आहेत. ती कुटुंबाच्या पालनपोषणाकरता जलालपूर येथील एका मदरशात स्वयंपाकीचे काम करते. तिचे घर मदरशापासून लांब असल्याने अनेक वेळा ती मदरशाच्या  एका खोलीतच मुक्कामाला असते. या मदरस्यात शिकवणारे अन्य ३ शिक्षकही रात्रीला मदरशातच मुक्काला  असतात. पीडितेच्या आरोपानुसार ३० मार्चच्या रात्री ११ वाजता या तिघांनी अचानक तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *