नोएडा (उत्तरपदेश) : ४ एप्रिल या दिवशी येथील गौतम बुद्ध नगरामध्ये सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीकडून श्रीरामनवमीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील सनातन धर्म (श्रीराम) मंदिरामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी श्रीरामनवमीचे आध्यात्मिक महत्त्व या विषयावर राजरानी माहुर यांनी, तर रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता या विषयावर कु. कृतिका खत्री यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक वृत्तपत्रांनी प्रसिद्धीपत्रकाची मागणी केल्यावर त्यांना कार्यक्रमाचे वृत्त पाठवण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात