Menu Close

हिंदु जनजागृती समितीने राऊरकेला (ओडिशा) येथील शाळा-महाविद्यालयांमध्ये घेतलेल्या प्रवचनांना उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु नववर्षाचे महत्त्व सांगणार्‍या प्रवचनांचे विविध ठिकाणी आयोजन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक वर्गात मार्गदर्शन करतांना श्री. प्रकाश मालोंडकर

राऊरकेला (ओडिशा) : हिंदु नववर्ष जनजागृती २०१७ या अभियानाच्या अंतर्गत वेदव्यास येथील व्यासदेव हायस्कूल, तसेच गुरुकुल संस्कृत महाविद्यालय येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रकाश मालोंडकर यांनी हिंदु नववर्षाचे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सरस्वती शिशु मंदिर, कलुंगा आणि प्रियदर्शिनी हायस्कूल, कलुंगा येथे सनातन संस्थेचे श्री. श्रीराम काणे यांनी याच विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एकूण ३ विद्यालये आणि एक महाविद्यालय यांच्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या प्रवचनांचा लाभ घेतला.

कौरमुंडा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेने नववर्षानिमित्त आयोजित केलेल्या बौद्धिक वर्गात प्रमुख अतिथी म्हणून श्री. प्रकाश मालोंडकर यांनी मार्गदर्शन केले. सुमारे ६० संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. अधिवक्ता श्री. विभूतिभूषण पलेई यांच्या राऊरकेला येथील निवासस्थानी चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षानिमित्त यथाविधी ब्रह्मध्वज पूजन करण्यात आले. या वेळी धर्मशिक्षणवर्गात येणारे अधिवक्ता श्री. करमचंद जेना सहकुटुंब उपस्थित राहिले. याचबरोबर वेदव्यास, राऊरकेला, कलुंगा, राजगंगपूर, हाथीवाडी, बिरमित्रपूर आणि कौरमुडा या गावांतून हिंदु नववर्ष जनजागृतीच्या १ सहस्र  हस्तपत्रकांचे वितरण करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *