Menu Close

हिंदूंनी घेतली भारतात रामराज्य आणण्याची शपथ !

  • श्रीरामनवमीच्या निमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन

  • नालासोपारा येथे ‘श्रीराम मंदिर निर्माण संकल्प यात्रा’ !

  • आता हिंदूंनीच संघटित होऊन अयोध्येत श्रीराममंदिर बांधावे ! – समस्त हिंदूंचा निर्धार

संकल्पयात्रेत सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ

नालासोपारा : अयोध्येत श्रीराममंदिर बांधले जाणे, हा हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्‍न बनला आहे. त्यामुळे आता कोणत्याही राजकीय पक्षावर किंवा नेत्यावर विसंबून न रहाता भारतभूमीतील समस्त हिंदूंनी संघटित होऊन अयोध्येत श्रीराममंदिर बांधण्यासाठी आणि भारतभूमीत रामराज्य (हिंदु राष्ट्र) आणण्यासाठी संकल्प करावा, या उद्देशाने समस्त हिंदुत्ववादी आणि राष्ट्रप्रेमी संघटनाच्या वतीने श्रीरामनवमीच्या पवित्र दिनी येथे ‘श्रीराम मंदिर निर्माण संकल्प यात्रा’ काढण्यात आली. या वेळी उपस्थित सर्व हिंदूंनी प्रभु श्रीरामचंद्रांना स्मरून अयोध्येत श्रीराममंदिर बांधण्यासाठी आणि भारतात रामराज्य (हिंदु राष्ट्र) आणण्यासाठी कटीबद्ध रहाण्याची शपथ घेतली.

सृष्टीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंतच्या कालखंडात भूतलावरील आदर्श राजा म्हणून ‘प्रभु श्रीरामचंद्रा’चे उदाहरण दिले जाते, तर सर्वोत्तम राज्य म्हणून ‘रामराज्या’चा उल्लेख केला जातो. अशा प्रभु रामचंद्रांचा जन्म आपल्या भारतमूमीत झाला, ही प्रत्येक भारतियासाठी महत्भाग्याची गोष्ट आहे; मात्र ज्या पवित्र स्थळावर प्रभु श्रीरामचंद्रांनी पृथ्वीवर अवतार घेतला, दुर्दैवाने त्याच ठिकाणी रामलांना एका ‘दहा बाय दहा’च्या तंबूत, पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात दिवस कंठावे लागत आहेत. राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि हिंदूंच्या अतिसहिष्णुतेमुळे प्रभु श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीतच त्यांचे मंदिर बांधण्याच्या मागणीसाठी हिंदूंना प्रभू श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे द्यावे लागणे, आंदोलने करावी लागणे हे दुर्दैवी असल्याचे मत हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी या वेळी व्यक्त केले.

हिंदू गोवंश रक्षा समिती, बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग सेवा दल, , हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था या संघटनांचे आणि भाजप, शिवसेना आणि मनसे या पक्षांचे कार्यकर्ते यांसह १ सहस्र ५०० धर्माभिमानी हिंदू या संकल्प यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

नालासोपारा (प.), सोपारा गाव येथील श्री चक्रेश्‍वर महादेव मंदिराजवळ प्रभु श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेची आणि धर्मध्वजाची विधीवत् पूजा करून संकल्प यात्रेला आरंभ करण्यात आला. फुलांनी सजवलेल्या रथामध्ये प्रभु श्रीरामचंद्राची प्रतिमा स्थापन करण्यात आली होती. समेळ पाडा-पंचमुखी हनुमान मंदिर-टाकी रोड या मार्गाने मार्गक्रमण करत नालासोपारा (पू.) येथील सेंट्रल पार्क मैदानात ‘श्रीराम मंदिर निर्माण संकल्प यात्रे’चा समारोप करण्यात आला. ‘श्रीराम मंदिर निर्माण संकल्प यात्रे’च्या समारोपाच्या वेळी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या भाषणांतून उपस्थित हिंदूंचे प्रबोधन केले. या वेळी सहभागी हिंदूंनी अयोध्येत श्रीराममंदिर निर्माण करण्यासाठी आणि भारतभूमीत रामराज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन करण्यासाठी कटीबद्ध रहाण्याची सामूहिक शपथ घेतली. या संकल्प यात्रेला स्थानिक पोलिसांचे उत्तम सहकार्य लाभले.

‘प्रभु श्रीराम’ यांचा आदर्श ठेवून हिंदुत्वाची शक्ती दाखवूया ! – श्री. शिवकुमार पांडे, बजरंग दल

आजच्या ‘श्रीराम मंदिर निर्माण संकल्प यात्रे’त सहभागी होऊन आपण जो संघटितपणा दाखवला, तसाच संघटितपणा हिंदूंवर होत असलेल्या प्रत्येक आघाताविषयी दाखवायला हवा. प्रभु श्रीराम यांचा आदर्श ठेवून हिंदुत्वाची शक्ती दाखवूया. आज हिंदूंना कोणी वाली नाही, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे आपल्याला प्रसंगी प्राणही अर्पण करण्याची सिद्धता ठेवली पाहिजे.

क्षणचित्रे

१. यात्रामार्गातील ५ किलोमीटरच्या संपूर्ण परिसरात भगवे ध्वज लावून यात्रामार्ग भगवामय करण्यात आला होता.

२. संकल्प यात्रेच्या मार्गात अनेक ठिकाणी सुवासिनींनी प्रभु श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेचे आणि धर्मध्वजाचे औक्षण केले.

३. सहभागी हिंदूंनी हातात धरलेले प्रबोधनात्मक हस्तफलक लोकांच्या आकर्षणाचा विषय बनले होते.

४. ‘फेसबूक लाइव्ह’ या प्रणालीच्या माध्यमातून संकल्प यात्रेच्या प्रक्षेपणाचा १ लक्षहून अधिक लोकांनी लाभ घेतला.

हिंदूंनी हातात धरलेल्या हस्तफलकांवरील प्रबोधनात्मक लिखाण

  • ‘हिंदुओ का एक नारा । अयोध्या मैं हो राम मंदिर हमारा ॥’
  • ‘राम जन्मभूमी है हिंदुओकी ।
  • नही किसीके बाप की ॥’
  • ‘हर हिंदू का एक ही सपना अयोध्या में हो भव्य राम मंदिर अपना ॥’
  • ‘अगर छुआ मंदिर तो तुझे दिखा देंगे । हम तुझको तेरी औकात बता देंगे ।’
  • ‘आधा नहीं पुरा चाहिये । अयोध्या में भव्य राम मंदिर ही चाहिये ।’
  • ‘शपथ राम की खाते है मंदिर वही बनाएंगे ।’
  • ‘राम मंदिर के निर्माण मैं हर हिंदु मैदान मैं ।’
  • ‘चर्चा नही निर्णय दो । राम मंदिर अयोध्या में ही हो !’

संकल्पयात्रेत हिंदूंकडून उत्स्फूर्तपणे देण्यात आलेल्या घोषणा !

‘कहो गरजकर हम हिन्दू है । हिन्दुस्तान हमारा है ।’, ‘अरे हर हिन्दू का नारा है । हिन्दुस्तान हमारा है ॥’, ‘राममंदिर तो होना है । हिन्दुस्तान हमारा है ॥’, ‘बाबर का नाम मिटाना है । हिन्दुस्तान हमारा है ॥’, ‘भगवा ध्वज लहराना है । हिन्दुस्तान हमारा है ॥’, ‘अरे कौन चले रे कौन चले, प्रभु श्री राम के वीर चले’, ‘अरे मंदिर तो बनाएंगे ।

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *