असे तथाकथित कीर्तनकार हिंदु धर्माला कलंकच !
अमरावती : येथील जेवडनगर भागात नुकत्याच पार पडलेल्या श्रीमद्भागवत कथा सप्ताहात मोहन लांडगे या तथाकथित कीर्तनकाराने साधु-संतांना बलात्कारी म्हटल्याने हिंदुत्वनिष्ठांनी त्यांना चांगलाच चोप दिला.
१. या वेळी लांडगे यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज, श्री संतोषीमाता, गुढीपाडवा, हिंदु संत, सत्यनारायणाची पूजा यांविषयी आणि महिलांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली.
२. त्यामुळे उपस्थित भक्त, स्थानिक हिंदुत्वनिष्ठ महिला आणि पुरुष यांचा रोष अनावर झाल्याने त्यांनी लांडगे यांना चांगलाच चोप दिला. त्यानंतर ह.भ.प. सोपान कनेरकर यांनी त्यांना सर्वांसमोर जाहीर क्षमायाचना करायला लावली.
३. यानंतर लांडगे यांनी ‘येथून पुढे देव, देश आणि हिंदु धर्म यांवर टीका न करता ब्रिगेडी विचारांचा प्रचार न करता केवळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा प्रचार करीन’ असे, आश्वासन देत काढता पाय घेतला.
४. या वेळी नगरसेवक नंदू हरणे, ह.भ.प. मानव बुद्धदेव यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ महिला अन् पुरुष उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात