-
श्रीरामनवमीनिमित्त वज्रदल संघटनेच्या वतीने धारावी परिसरात भव्य मिरवणूक
-
गोरक्षण देखाव्यातील कसायाच्या हातातील सुरा पोलिसांनी काढायला लावला !
मुंबई : भगवान श्रीकृष्णाची तुलना रोडरोमियोशी करणार्या प्रशांत भुषण यांच्यावर कारवाई होत नाही, महिला दिनी समस्त महिलांची अवहेलना करणारे ट्वीट करणार्या राम गोपाल वर्मांच्या विरोधात कारवाई होत नाही, राणी पद्मावतीचे चुकीचे चित्रीकरण करून तिचे शीलहनन करण्याचा प्रयत्न करणार्या संयज लीला भन्साळींवर कारवाई होत नाही; मात्र हिंदूंनी श्रीरामनवमीच्या दिनी प्रभु श्रीरामचंद्रांची मिरवणूक काढायची म्हटली की, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यांना नोटिसा बजावल्या जातात. ही स्थिती पालटण्यासाठी आणि हिंदूंना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी समस्त हिंदूंनी संघटित होऊन या भारतभूमीत पुन्हा एकदा रामराज्य (हिंदु राष्ट्र) आणण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी केले. वज्रदल संघटनेच्या वतीने श्रीरामनवमीनिमित्त धारावी परिसरात काढण्यात आलेल्या श्रीराम मिरवणुकीच्या समारोपाच्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी अन्य हिंदुत्वनिष्ठांनी आपले विचार मांडून उपस्थितांमधील धर्मतेज जागवले.
प्रतिवर्षीची मिरवणुकीची स्थिती
धारावी येथील वज्रदल संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी श्रीरामनवमी उत्सव उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने धारावी परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत परिसरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना, मंडळे आणि धर्माभिमानी हिंदू मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांची अनुमती मिळण्याकरिता संघटनेचे कार्यकर्ते प्रतिवर्षी पोलीस ठाण्यात आवेदन देतात; मात्र प्रत्येक वेळी पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करून मिरवणुकीला अनुमती नाकारली जाते किंवा मिरवणुकीच्या मार्गात पालट करण्यास सांगितले जाते. या मिरवणुकीमध्ये सहभागी होणारी मंडळे, संघटना आणि हिंदुत्वनिष्ठांना मिरवणूक त्यांच्या परिसरातून मार्गान्वित व्हावी, असे वाटत असते; मात्र मिरवणुकीच्या या नियोजित मार्गातील रस्त्यालगत धर्मांधाची भंगाराची अनेक दुकाने आहेत. यातील बहुतांश दुकानदारांनी रस्त्याचा भाग अवैधरित्या बळकावला आहे. त्यामुळे पोलीस या भागातून मिरवणूक नेण्यास बंदी करतात. परिणामी पोलिसांनी ठरवून दिलेला मार्ग अत्यंत लहान आणि एकाच परिसरातून जाणारा असूनही हिंदूंना त्याच मार्गावरून मिरवणूक न्यावी लागते. मुसलमानांच्या सणांच्या वेळी मात्र या संपूर्ण मार्गातून उरूस काढण्यास पोलिसांकडून अनुमती दिली जाते.
मिरवणुकीसाठी पोलिसांचा फौजफाटा
ज्या भागातून मिरवणूक काढली जाते त्या भागात हिंदु आणि मुसलमान यांची घरे मिश्र प्रमाणात आहेत त्यामुळे पोलिसांच्या दृष्टीने हा परिसर अतिसंवेदनशील म्हणून गणला जातो. परिणामी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मिरवणुकीच्या वेळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला होता. यामध्ये राज्य राखीव दल आणि दंगल नियंत्रण पथकाच्या गाड्यांचाही समावेश होता. धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बांगर हे स्वत: पोलिसांसमवेत उपस्थित होते. (जिथे खरोखरच धर्मांध दंगलीची सिद्धता करून पूर्वनियोजित दंगली घडवून आणतात, तिथे पोलिसांकडून एवढी काळजी घेतल्याचे दिसत नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
मिरवणुकीतील देखाव्यातील कसायाच्या हातातील सुरा पोलिसांनी काढायला लावणे
पोलिसांना गोमातेच्या हत्येचा देखावा प्रक्षोभक वाटतो, पण जे कसाई प्रत्यक्षात सहस्रो गोमातांची हलाल करून प्रतिदिन हत्या करत असतात, ते त्यांना प्रक्षोभक वाटत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
या वर्षी मिरवणुकीमध्ये एका वाहनावर गोरक्षण या विषयावर आधारित जिवंत देखावा उभारण्यात आला होता. यामध्ये एक धर्मांध कसाई गोमातेला पकडून तिच्यावर सुरा फिरवण्याच्या सिद्धतेत दाखवण्यात आला होता. तर गोमातेच्या दुसर्या बाजूने एक हिंदू गोमातेला बिलगून कसायाच्या तावडीतून तिची सुटका करण्याचा प्रयत्न करत आहे, असेे दाखवण्यात आले होते. देखाव्याच्या मागील बाजूस गोमातेच्या सर्वांगीण उपयुक्ततेविषयीची माहिती देणारा फलक लावण्यात आला होता. धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बांगर यांनी हा देखावा पहाताच तो प्रक्षोभक आहे, असे सांगून कार्यकर्त्यांना कसायाच्या हातातील लाकडी सुरा काढून ठेवण्यास सांगितले. या वेळी कार्यकर्त्यांनी सांगितले, देखाव्यात सत्य तेच दाखवले आहे. मागील बाजूस गोमातेची उपयुक्तताही दाखवली आहे; मात्र कार्यकर्त्यांची कुठलीही गोष्ट ऐकून न घेता बांगर यांनी कसायाच्या हातात दाखवण्यात आलेला लाकडी सुरा काढून घेतला.
मिरवणुकीत वाजवण्यात आलेल्या ध्वनीक्षेपकाच्या आवाजाचे मापन करण्यासाठी पोलिसांनी ध्वनीमापक यंत्र आणले होते. ध्वनीक्षेपकाच्या ध्वनीचे मापन करून पोलिसांनी त्याची नोंद करून घेतली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात