कल्याण : रामनवमी उत्सव समिती, कल्याण यांच्या वतीने गुढीपाडव्यापासून ते श्रीरामनवमीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन भगवा तलाव येथे करण्यात आले होते.
या कालावधीत स्वामी धर्मानंद यांचे सुंदरकांड या विषयावर, श्रीमती मनीषा जाधव आणि शुभम गोवेकर यांच छत्रपती संभाजी महाराज या विषयावर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांचे स्वातंत्रवीर सावरकर या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले होते. राष्ट्र आणि धर्मावरील आघात जसे लव्ह जिहाद, धर्मांतर, आतंकवाद यांवरही उपस्थित वक्त्यांनी त्यांची परखड मते मांडली आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता का आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.
श्रीरामनावमीच्या दिवशी प्रभु श्रीरामांची पालखी काढण्यात आली. यात शेकडो हिंदु युवक सहभागी झाले होते. या वेळी युवकांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पालखीच्या मार्गात वाहतुकीचे नियमन करण्याचे कार्य पोलीस न करता हिंदुत्वनिष्ठच करीत होते. या पालखीत भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार, तसेच सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.
हिंदूंच्या सणांवर दबाव टाकणारे पोलीस असे मुसलमानांच्या संदर्भात करू धजावतील का ?
१. मंदिर वही बनायेंगे हे गाणे प्रसारित करण्यास पोलिसांनी मज्जाव केला .
२. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांनी बूट न काढतच पालखीचे दर्शन घेतले.
३. हिंदु जनजागृती समितीचे वक्ते श्री. प्रसाद वडके यांचे व्याख्यान संपल्यावर एक साध्या वेशातील पोलिसाने मी हाडवैद्य आहे असे खोटे सांगून प्रसाद यांचा संपर्क क्रमांक घेतला. (एवढे कष्ट पोलिसांनी धर्मांधांत लपलेल्या आतंकवाद्यांच्या हस्तकांना शोधण्यासाठी घेतले, तर पूर्वनियोजित दंगली तरी टळतील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात