Menu Close

अनुभव येत नसल्यास देवाचे अस्तित्व नाकारणे हास्यास्पद ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

जबलपूर (मध्यप्रदेश) : लोकांचा विज्ञानावर खरच विश्‍वास असला असता, तर त्यांनी कोणत्याही प्रकारचा विमा काढला नसता. अणूबॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान आज सर्वज्ञात आहे; पण आज जगातील केवळ ५ देश ते बनवू शकले. बाकीचे बनवू शकले नाहीत, याचा अर्थ विज्ञान चुकीचे आहे, असा होत नाही, तर ते बनवू न शकणार्‍यांना काही मर्यादा आहेत, हे आपण लक्षात घेतो. त्याचप्रमाणे योग्य उपासना केल्यास देवाच्या अस्तित्वाची अनुभूती येतेच. त्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अनुभव येत नसल्याने देवाचे अस्तित्व नाकारणे हास्यास्पद आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले. येथील विजयनगर येथे हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाचे वाचक श्री. आशीष श्रीवास्तव यांच्या घरी आयोजित एका बैठकीत ते बोलत होते.

पू. डॉ. पिंगळे म्हणाले की, शल्यकर्म करणारा आधुनिक वैद्य प्रथम रुग्णाची अथवा रूग्णाच्या नातेवाइकांची लेखी अनुमती घेतो. येथे तो त्याच्या आणि विज्ञानाच्या मर्यादा स्पष्ट करतो. त्याचप्रमाणे एखाद्या औषधाच्या गोळीने त्या प्रकारच्या सर्वच रूग्णांचा आजार बरा का होत नाही ? देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेणार्‍यांनी प्रथम विज्ञानाच्या मर्यादा आणि त्यातील अंधश्रद्धा यांविषयी बोलावे. अनुभव येत नसलेल्या गोष्टीचे अस्तित्व नाकारण्यापेक्षा स्वतःच्या मर्यादा लक्षात घ्यायला हव्यात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *