Menu Close

मोठे वाघोदा (जळगाव) येथे हिंदुद्वेषातून अज्ञात समाजकंटकाने फाडला भगवा ध्वज !

हिंदूंची अस्मिता असलेल्या भगव्या ध्वजाची विटंबना करायला, हा पाक आहे का ? अन्य धर्मियांविषयी असा प्रकार घडला असता, तर त्याचे किती भयंकर पडसाद उमटले असते, हे वेगळे सांगायला नको; मात्र हिंदू संघटित नसल्यामुळेच हिंदूंच्या अस्मिता पायदळी तुडवल्या जातात ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मोठे वाघोदा (जळगाव) : ७ एप्रिल या दिवशी सकाळी येथील उर्दू शाळेजवळील विजेच्या खांबावरील एक भगवा ध्वज फाडून फेकून दिल्याचे हिंदुत्वनिष्ठांच्या निर्दशनास आले. (हिंदूंचा असंघटितपणा आणि शासनकर्त्यांचे धर्मांधांप्रती असलेले कमकुवत धोरण यामुळेच असे प्रकार घडतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) उर्दू शाळेजवळील विजेच्या खांबावरील भगवे ध्वज काढून घ्यावेत, अशी तक्रार येथील धर्मांधानी पोलीस ठाण्यात केली होती.

भगव्या ध्वजाचा अवमान झाला; म्हणून हिंदुत्वनिष्ठांकडून तक्रार प्रविष्ट करण्यात येणार आहे. या घटनेनंतर पोलीस ठाण्याने गावातील सर्व धर्मियांचे झेंडे काढण्याचे आदेश दिले होते (हिंदुस्थानात हिंदूंच्या ध्वजाचा अशा प्रकारे अवमान झाल्यावर तो सन्मानाने लावला जाऊन संबंधितांना शिक्षा झाली पाहिजे. असे न होता वरील प्रकारे निर्णय होणे, हा गेली ६९ वर्षे झालेल्या आणि अजूनही होत असलेल्या धर्मांधांच्या तुष्टीकरणाचे परिणाम आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात); परंतु पोलिसांनी हिरवे झेंडे न काढता केवळ भगवे ध्वजच काढल्याचे हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास येत आहे. (यावरून हिरव झेंडे काढण्याचे धाडस पोलिसांमध्ये नाही, असे हिंदूंनी समजायचे का ? हिंदूंनो, अशा हिंदुद्वेषी पोलिसांची त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करून त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *