Menu Close

गोवा येथे षष्ठ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सिद्धतेला आरंभ !

फोंडा (गोवा) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे १९ ते २१ जून २०१७ या कालावधीत षष्ठ अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात हिंदु धर्म आणि समाज यांवर होणार्‍या आघातांचा प्रतिकार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती (संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, संपादक, लेखक) सहभागी होणार आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना, हे या अधिवेशनाचे प्रमुख ध्येय आहे. या समवेतच १३ ते १५ जून या कालावधीत हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता निर्मिती शिबीराचे आयोजनही करण्यात आले आहे. या अधिवेशन आणि शिबीराला भारतातील २५ राज्ये तसेच नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका इत्यादी राष्ट्रांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.

अधिवेशनाच्या आयोजनासाठी धर्मदान करण्याची विनंती !

अधिवेशनासाठी सभागृह, निवास, भोजन, प्रदर्शन, स्थानिक वाहतूक इत्यादी कारणांसाठी अनुमाने ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. धर्मप्रेमी दानशुरांनी या कार्यासाठी सढळ हस्ते अर्थसाहाय्य करावे. या धर्मदानावर आयकर कायदा, १९६१ नुसार ८०जी(५) खाली आयकरात सूट मिळू शकते. अर्पणदाते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. धनादेश हिंदु जनजागृती समितीच्या नावे स्वीकारले जातील.

धर्मदानासाठी विवरण

बँकेचे नाव : Bank of Maharashtra शाखेचे नाव : शिवशाही, सोलापूर

बचत खाते क्रमांक : 60167682010 बचत खात्याचे नाव : हिंदु जनजागृती समिती

आयएफएससी क्रमांक : MAHB0000668

विशेष सूचना : धर्मदान म्हणून बँकेत निधी जमा केल्यानंतर त्यासंबंधीची तपशीलवार माहिती [email protected] या ई-मेल पत्त्यावर पाठवावी किंवा श्री. सुरजित माथुर यांना (०८३२) २३१२६६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *