Menu Close

६ गोवंशियांना कोंबून नेणारा धर्मांध चालक आणि व्यापारी यांना अटक

गोवंशियांची कत्तलीसाठी केली जाणारी वाहतूक म्हणजे गोवंश हत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्याचाच परिणाम !

श्रीशिवप्रतिष्ठानच्या गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे गोवंशियांचे प्राण वाचले

मिरज – येथे टेम्पोतून ६ गोवंशियांना कोंबून नेणारा धर्मांध चालक जावेद पटेल (वय २६ वर्षे) आणि व्यापारी अक्रम बेपारी यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. गोवंशियांचे प्राण वाचवण्यात श्रीशिवप्रतिष्ठानचे गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

१. गोवंशियांना कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे कळताच श्रीशिवप्रतिष्ठानचे गोरक्षा समितीचे श्री. विनायक माईणकर आणि काही शिवसैनिक यांनी तात्काळ शहर पोलिसांना कळवले.

२. पोलिसांनी अधिक तपासणी केल्यावर जावेदकडे गोवंशियांच्या वाहतुकीचा परवाना नसल्याचे आढळले. त्याने गोवंशियांच्या चारा-पाण्याचीही व्यवस्था केली नव्हती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *