Menu Close

प्रभु श्रीरामाचे गुण आत्मसात करून आचरण करणे हीच खरी रामनवमी ! – सौ. सुनीता दीक्षित

मार्गदर्शनाचा लाभ घेतांना महिला

म्हसवड (जिल्हा सातारा) – प्रभु श्रीराम हे सर्वांगाने आदर्श होते; म्हणून तेव्हाची प्रजाही साधना करणारी आणि आनंदी होेती. अशा रामराज्याची सध्याच्या काळात आवश्यकता आहे. त्यामुळे रामनवमीला केवळ उत्सव म्हणून साजरा न करता श्रीरामाचे गुण आत्मसात करून तसे आचरण करणे, हीच खरी रामनवमी होय, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुनीता दीक्षित यांनी केले. २ एप्रिल या दिवशी येथील श्रीराम-हनुमान मंदिराचे विश्‍वस्त श्री. वाळूंजकर शास्त्री यांनी आयोजित केलेल्या मार्गदर्शनात त्या बोलत होत्या. या वेळी ५० हून अधिक गावकरी आणि नगरसेविका सौ. हिंदमाला राजेमाने उपस्थित होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *