संतप्त हिंदूंची गाव सोडून जाण्याची चेतावणी
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या घटनेकडे लक्ष देऊन हिंदूंना न्याय देतील, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
बिजनौर (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील नजीबाबाद तालुक्यातील जोगीरामपुरा गावामध्ये ४०० वर्षे जुन्या असणार्या शिवमंदिरावरील ध्वनीक्षेपक हटवल्याने संतप्त झालेल्या हिंदूंनी गाव सोडून जाण्याची धमकी दिली आहे. काही हिंदूंनी स्वतःच्या घराबाहेर घर विक्रीसाठी आहे अशी पाटीही लावली आहे. या घटनेमुळे या गावात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. श्रीरामनवमीच्या दिवशी येथे हिंदु युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांकडून मंदिरावर ध्वनीक्षेपक लावण्यात आले होते. त्यावर धर्मांधांनी आक्षेप घेतला होता. (हिंदूंच्या उत्सवाच्या वेळी काही तरी कुरापत काढून त्यांना उत्सवाचा आनंद लुटू द्यायचा नाही, ही धर्मांधांची जुनी खोड आहे. अशा धर्मांधांना उत्तरप्रदेशातील भाजप शासनाने वठणीवर आणावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक) त्यामुळे पोलीस आणि प्रशासन यांनी घटनास्थळी येऊन ध्वनीक्षेपक हटवले होते. (हिंदु युवा वाहिनी ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच स्थापन केली आहे. हे ज्ञात असूनही पोलीस या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लावलेले ध्वनीक्षेपक हटवतात, यावरून पोलीस किती हिंदुद्वेषी आहेत, हेच दिसून येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
भाजपच्या राज्यातही आम्ही मंदिरावर ध्वनीक्षेपक लावू शकत नाही, तर गावात रहाण्यात काय अर्थ ? – हिंदु ग्रामस्थाचा प्रश्न
नरेश सैनी नावाच्या गावकर्याने सांगितले की, ४ सहस्र लोकांच्या या गावात केवळ ५०० हिंदू आहेत. वर्ष २००७ मध्ये पहिल्यांदा मंदिरावरील ध्वनीक्षेपक काढण्यात आले होते. त्यानंतर आम्ही मंदिराच्या आत ते लावले. मुसलमान त्यांच्या मशिदीमधून प्रतिदिन ध्वनीक्षेपकावरून बांग देतात. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी आमचा आवाज दाबला होता. आम्ही भाजपचे सरकार येण्याची वाट पहात होतो. ते आल्यावर आम्हीच हिंदु युवा वाहिनीला ध्वनीक्षेपक लावण्याचा आग्रह केला. जर आम्ही भाजपच्या राज्यातही मंदिरावर ध्वनीक्षेपक लावू शकत नाही, तर या गावात रहाण्यात काय अर्थ आहे ?
आम्ही प्रतिदिन आरतीच्या वेळी ध्वनीक्षेपक लावणार ! – मंदिर समिती
मंदिर समितीचे अध्यक्ष दयाराम सैनी म्हणाले की, अधिकार्यांनी सांगितले की, आम्ही सणांच्या वेळी ध्वनीक्षेपकाचा वापर करू शकतो; मात्र आम्ही त्याला नकार दिला आहे. आम्ही प्रतिदिन आरतीच्या वेळी ध्वनीक्षेपक लावणार आहोत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात