भारतात एका नव्या रामराज्याचा हळूवारपणे उदय होत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पुन्हा एकवेळा धर्माची चर्चा चालू झाली आहे, असे उद्गार अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक सायन्सचे संस्थापक पद्मभूषण डॉ. डेव्हिड फ्रॉली उपाख्य पंडित वामदेव शास्त्री यांनी काढले आहे.
वैदिक शिक्षक डॉ. फ्रॉली ‘ट्विटर’वर मत व्यक्त करतांना म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यामुळे उत्तरप्रदेशात एका नवीन युगाचा प्रारंभ होईल. भारत नेहमीच नेहरूवादी दृष्टीकोनाच्या बंधनात राहिला आहे. वर्ष २०१४ पर्यंत नेहरूवादी दृष्टीकोन असणार्या काँग्रेसच्या सरकारांनी देशात योग, धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरा यांच्याकडे केवळ दुर्लक्षच केले नाही, तर अल्पसंख्यांक मतपेढीचे राजकारण केले, तसेच त्यांनी भारताच्या धार्मिक गोष्टींचे महत्त्वही अल्प करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला. दुसरीकडे मोदी सरकारने देशात आणि विदेशातही योग अन् भारताच्या अन्य धार्मिक मूल्यांना महत्त्व दिले. त्यामुळे भारत आता धार्मिक परंपरेच्या मार्गावर चालू लागला आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात