- पाक आणि बांगलादेशी मुसलमान नागरिकांच्या साहाय्यासाठी तत्पर असणार्या भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकमधील या भारतीय हिंदु नागरिकाच्या सुटकेसाठी गेल्या वर्षभरात काय केले आणि आता काय करणार आहेत, हे त्यांनी सांगायला हवे !
- पाक कोणत्याही भारतीय नागरिकाला पकडून त्याला गुप्तहेर ठरवून फाशीची शिक्षा देत असतांना भारत केवळ मूकदर्शक बनून रहाणार आहे का ? असे किती ‘सरबजित सिंह’ झाल्यावर भारत कारवाई करणार ?
- हेरगिरीचा आरोप – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : वर्ष २०१६ च्या मार्चमध्ये पाकच्या बलुचिस्तानमधील हेरगिरीच्या प्रकरणी पाकने अटक केलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. (अवघ्या वर्षभरात भारतीय नागरिकाला गुप्तहेर ठरवून त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात येते, तर भारतात असे का घडत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यांना रावळपिंडी येथील सैन्य न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. पाकच्या लष्करी कायद्यातील कलम ५९ आणि गोपनीयतेच्या कायद्यातील कलम ३ नुसार जाधव यांच्यावर खटला भरण्यात आला होता. पाकची गुप्तहेर संघटना असलेल्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सने (आयएस्आयने) प्रसिद्धपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. ‘जाधव भारताचे नागरिक आहेत; पण ते गुप्तहेर नाहीत’, असे केंद्र सरकारने म्हटले होते.
पाकमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी जाधव घातपाती कारवाया करत असल्याचा आरोप पाककडून करण्यात आला होता, तसेच अटकेच्या काही महिन्यांनी पाकने कुलभूषण जाधव यांची एक चित्रफीतही प्रसिद्ध केली होती. यात जाधव यांनी ‘मी भारतीय गुप्तहेर संस्था ‘रॉ’साठी काम करत आहे’, अशी स्वीकृती दिली होती. ‘बलुचिस्तान आणि कराची येथे अशांतता निर्माण करण्यासाठी ‘रॉ’ने मला तैनात केले होते’, असेही त्यांनी यात म्हटले होते; मात्र या चित्रफितीत अनेक फेरफार करण्यात आल्याचे उघड झाले होते.
मूळचे मुंबईचे असलेले कुलभूषण जाधव हे नौदलातील माजी अधिकारी आहेत. मुदतीपूर्वीच त्यांनी निवृत्ती घेतली होती. निवृत्तीनंतर त्यांनी जहाजाने मालवाहतूक करण्याचा व्यवसाय चालू केला होता. जाधव यांना इराणमधून आमिष दाखवून बलुचिस्तानात नेण्यात आले होते.
जाधव यांना फाशी दिली, तर ती पूर्वनियोजित हत्या समजू ! – भारताची चेतावणी
याचा अर्थ जाधव यांना फाशी देण्यात येणार, हे भारताने गृहित धरले आहे का ? अशा चेतावण्यांना पाक भीक घालत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे त्याला जी भाषा समजते, त्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
देहली : कायदा आणि न्यायाचे मूलभूत नियम न पाळता कुलभूषण जाधव यांना फाशी दिली, तर ती आम्ही पूर्वनियोजित हत्या समजू, असे पत्र भारताने पाकिस्तान उच्च आयोगाला लिहिले आहे. कोणत्याही वैध पुराव्याविना जाधव यांना फाशी देणे हास्यास्पद आहे. त्यांच्यावर खटला चालवला जात आहे, याची माहितीही आतापर्यंत भारताला देण्यात आली नव्हती, अशा शब्दांत भारताने पाकवर टीका केली आहे.
१. कुलभूषण जाधव यांचे वर्ष २०१६ मध्ये इराणमधून अपहरण करण्यात आले होते; मात्र ते पाकिस्तानमध्ये कसे सापडले, याचे उत्तर अजूनही पाकने दिलेले नाही. आंतरराष्ट्रीय कायद्याने याची माहिती घेण्याचा अधिकार भारताला दिलेला आहे.
२. भारताने २५ मार्च २०१६ ते ३१ मार्च २०१६ या काळात १३ वेळा पाकच्या उच्च आयोगाला कुलभूषण जाधव यांच्याविषयी माहिती मागितली; पण पाकने त्याला प्रतिसाद दिला नाही.
३. जाधव यांच्या विरोधात कुठलेही निर्णायक पुरावे नसल्याचे पाकचे परराष्ट्र धोरण प्रमुख सरताज अजीझ यांनी स्पष्ट केले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात