Menu Close

मशिदी आणि दर्गे यांवरील प्रदूषण करणारे अनधिकृत भोंगे तात्काळ काढा !

सातारा येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. संदीप पाटील यांना निवेदन देतांना धर्माभिमानी हिंदू

सातारा : पोलीस आणि प्रशासन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील अनधिकृत भोंगे तात्काळ काढावेत, स्वत:च्या अधिकार क्षेत्रातील मशिदी आणि दर्गे यांवरील भोंग्यामुळे होणारे प्रदूषण तत्परतेने थांबवावे, अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्यां संबंधित गुन्हेगारांवर खटला प्रविष्ट करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा मागण्यांचे निवेदन शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. संदीप पाटील आणि जिल्हाधिकारी श्री. अश्विन मुद्गल यांना दिले.

या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री आेंकार डोंगरे, अमोल सपकाळ, राहुल इंगवले, शिवराज तलवार, हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद गांधी, उमेश गांधी, दत्ता सणस, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक, श्री. सुनील दळवी, रणरागिणी शाखेच्या सौ. विद्या कदम, शिवसेनेचे खेड विभागप्रमुख श्री. रमेश बोराटे आदी मान्यवर आणि विविध गणेशोत्सव मंडळांचे २० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

निवेदनात म्हटले आहे की,

१. सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २००० मध्ये ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात दिलेल्या निकालात ध्वनीक्षेपकांतून होणाऱ्यां आवाजाविषयी मर्यादा घालून दिल्या होत्या; मात्र मशिदींवरील भोंग्यांतून होणाऱ्यां प्रदूषणाच्या संदर्भात न्यायालयीन आदेशाची कार्यवाही झालेली दिसून येत नव्हती. त्यामुळे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका प्रविष्ट झाल्या.

२. त्यावर १६ ऑगस्ट २०१६ या दिवशी न्यायालयाने आदेश दिला की, प्रार्थनास्थळे हा शांतता क्षेत्राचाच एक भाग असून त्यांना ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन करावेच लागेल. मशिदींवर अवैधरित्या भोंगे लावणे, हा मूलभूत अधिकार होऊ शकत नाही. त्यामुळे भोंगे तातडीने उतरवा. आदेशाची प्रत मिळण्याची वाट न पहाता कारवाई करा, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्यास सिद्ध रहा.

३. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याने एका धर्मियांच्या उपासनेने दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याला बाधा पोचू नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिकरित्या दिली जाणारी अजान म्हणजे अन्य धर्मियांच्या धर्मस्वातंत्र्यावर गदा आणणे आहे.

४. मशिदींवरील भोंग्यांतून पहाटे पहिली अजान देण्यात येते. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होते. भोंग्यांच्या आवाजाचा रुग्ण, लहान मुले, विद्यार्थी, वयस्कर यांना शारीरिक आणि मानसिक त्रास होतो; मात्र पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतात.

५. अनेक ठिकाणी पोलिसांनी गणेशोत्सव मंडळे, गोपाळकाला, दुर्गापूजन मंडळे यांना ध्वनीप्रदूषण करणे गुन्हा असल्याचे सांगत ध्वनीक्षेपक यंत्रणा बंद करण्यास भाग पाडले आहे; मात्र मशिदींवरील भोंग्यावर कधीच कारवाई करण्यात येत नाही. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात हा भेदभाव का ?

६. मानवी जीवनात झोप ही मूलभूत गोष्ट असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे; मात्र कायदाबाह्य अजानमुळे झोपेचाही अधिकार हिरावून घेण्यात येत आहे.

७. काही मासांपूर्वी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलने केली, तसेच पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने दिली; मात्र त्यावर काय कृती झाली, हे समजले नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *