Menu Close

शत्रूला कधी दया आणि शांती दाखवायची, हे केवळ छ. शिवाजी महाराजांना कळले ! – श्री. अरुण रामतीर्थकर

श्री. अरुण रामतीर्थकर, ज्येष्ठ पत्रकार

‘दयेची विटंबना फार पूर्वीपासून चालत आली आहे. पृथ्वीराज चौहानने अल्लाउद्दीनवर सोळा वेळा दया दाखवली. परिणाम सतराव्या वेळी काय झाला ? पृथ्वीराज संपला. या उलट प्रतापराव गुजर यांनी मुसलमान सरदार आणि त्यांच्या सैन्य तुकडीस दया दाखवून सोडले. हे कळताच शिवाजी महाराज संतापले. प्रतापरावाची निर्भत्सना केली. अस्थानी दया दाखवायची नसते, असे बजावले. खजील झालेल्या प्रतापरावांनी फक्त ६ सहकार्‍यांसह शत्रू तुकडीवर पुन्हा आक्रमण केले. भरपूर हानी केली; मात्र सर्वांना हौतात्म्य आले. या उलट नेताजी पालकर मुसलमान होऊन १२ वर्षांनंतर पश्‍चातापदग्ध होऊन परतल्यावर त्याला महाराजांनी धर्मांतराबद्दल क्षमा करून पुन्हा हिंदु धर्मात घेतले. पुनर्वसनही केले. दया, क्षमा केव्हा दाखवायची, केव्हा नाही हे केवळ महाराजांनाच कळले. बाकीचे दया, क्षमा, शांतीच्या भोवर्‍यात घोडचुका करत राहिले.’

छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सुरतेवरील स्वारीविषयी इंग्रजांनी लिहिलेला खोटा इतिहास प्रमाण मानणारे निर्बुद्ध भारतीय !

ह.भ.प. चारुदत्त आफळे

‘शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली, असे नव्हे, तर ४०० वर्षे मोगलांनी जी संपत्ती लुटून नेली, त्यातील थोडा भाग शिवाजी महाराज यांनी परत आणला. आपणावर राज्य करण्यासाठी आलेल्या इंग्रजांनी लिहिलेल्या इतिहासामध्ये शिवाजी महाराज हे लुटारू असल्याचे रूप सिद्ध करण्यात आले. दुर्दैवाने आक्रमकांचा इतिहास हिंदू प्रमाण मानत आहेत.’

मुसलमानांच्या भारतविजयाच्या भरतीच्या लाटेला चेतावणी देणारे पहिले राष्ट्रवीर शिवाजी महाराज !

सावरकरांनी आपल्या ग्रंथाचे दोन विभाग केले आहेत. पहिल्या भागात ते मराठा साम्राज्याचा, म्हणजे हिंदूपदपादशाहीचा उदयास्त सांगतात. त्यांच्या पहिल्या प्रकरणातील पुढील ओळी उद्धृत करणे आवश्यक आहे. ते लिहितात, ‘गजनीच्या महंमदाच्या आक्रमणासमवेत प्रारंभ झालेली मुसलमानांच्या भारतविजयाच्या भरतीची लाट वेगाने पुढे पसरून अखिल भारतवर्ष तिच्याखाली बुडून गेले होते. तिच्यामधून ज्यांनी आपले मस्तक वर काढले आणि आपल्या खड्या मराठी स्वरात तिला आज्ञा केली, ‘बस. याच्यापुढेे एक पाऊल येशील, तर ध्यानात धर’, असे ते पहिले राष्ट्रवीर शिवाजी महाराज !’

(संदर्भ : ‘धर्मभास्कर’, फेब्रुवारी १९९९)

मंदिरांच्या ठिकाणी उभारलेल्या मशिदी पाडून पूर्वीच्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणारे छत्रपती शिवाजी महाराज !

‘छत्रपती शिवाजी महाराजांवर बेभूल लट्टू होणार्‍या या हिंदु हितचिंतकांना ठाऊक नाही की, मुसलमानांनी मंदिरे पाडून उभारलेल्या मशिदी शिवाजी महाराजांनी पाडल्या आणि पूर्वीच्या मंदिरांचा कुठे कुठे जीर्णोद्धार केला होता. ‘शिवचरित्र साहित्या’त (खं. ८, पृ. ५५) १६७७ या वर्षीची अशीच एक घटना नोंदवण्यात आली आहे. एम्. आल्फ्रेड लेहूरो या फ्रेंच लेखकाला १९३७ या वर्षी श्री. नारायणम् पूलेकृत एक तामिळ हस्तलिखित सापडले. त्यांत कर्नाटकाच्या स्वारीतील ही घटना साधार आली आहे. ‘निधर्मी’पणाविषयी असत्य आणि स्वार्थी जयजयकार करणार्‍यांना यामुळे थोबाडात बसल्यासारखे होईल. होईल ते होईल ! खरे असे आहे की, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकोत्सवाच्या विषयी आमच्या शासनाचे ‘मोले घातले रडाया । नाही असू आणि माया ॥’ असेच झाले आहे ! असो.’

(संदर्भ : मासिक ‘प्रज्ञालोक’, जुलै १९७४)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *