Menu Close

बीरभूम (बंगाल) येथे हनुमान जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीवर पोलिसांचा लाठीमार !

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

बंगाल भारतात आहे कि बांगलादेशात ? केंद्र सरकार बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारांकडे कधी लक्ष देणार ?

कोलकाता (बंगाल) : बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सीओडी येथे ११ एप्रिलला हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीमार केल्याने येथे तणाव निर्माण झाला. यात काही जण घायाळ झाले. या मिरवणुकीत सहस्रो हनुमानभक्त सहभागी झाले होते.

पोलिसांचे म्हणणे होते की, या मिरवणुकीला प्रशासनाने अनुमती दिली नसतांना ती काढण्यात आली.

बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या राज्यात सातत्याने बॉम्बस्फोट होत आहेत ! अशा वेळी केंद्र सरकारने राज्य सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लावणे आवश्यक !

हाजीनगर येथे महावीर जयंतीच्या मिरवणुकीवर बॉम्बस्फोट करण्यापूर्वीच झालेल्या स्फोटात दोघा धर्मांधांचा मृत्यू

९ एप्रिलला हाजीनगर येथे महावीर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीवर बॉम्बस्फोट करण्याचा कट धर्मांधांनी रचला होता; मात्र बॉम्ब ज्या घरात बनवले जात होते, तेथेच त्याचा स्फोट झाला. यात दोघा धर्मांधांचा मृत्यू झाला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *