जबलपूर (मध्यप्रदेश) – येथे हिंदु सेवा परिषदेच्या वतीने आयोजित गदा यात्रा आणि हिंदु धर्मजागृती सभेसाठी आलेले हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि हिंदु संहतीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. तपन घोष यांनी येथे गौरी घाटावर नर्मदा आरतीत सहभाग घेतला. या वेळी पू. डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, नर्मदानदी ही भारताची सुषुम्ना नाडी आहे. माता नर्मदा आम्हाला हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी शक्ती देवो. श्री. तपन घोष म्हणाले, या आरतीत सहभागी होत आल्याने मला प्रसन्न वाटले. येथे आरतीसह नर्मदेची पवित्रता कायम राखण्यासाठी जी प्रतिज्ञा घेतली गेली, ही विशेष गोष्ट आहे. येणार्या काळात पूर्ण भारतात मी या आरतीचा उल्लेख करीन. माँ नर्मदा महाआरती समितीचे संस्थापक पंडित आेंकार दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरती संपन्न झाली.
क्षणचित्र : या वेळी माँ नर्मदा महाआरती समितीच्या वतीने पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि श्री. तपन घोष यांचा नर्मदेची प्रतिमा आणि माहितीपुस्तिका देऊन सन्मान करण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात