Menu Close

मनेसार (हरियाणा) : गोतस्करांकडून राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या मुख्यालयात घुसून गोळीबार

अशा गोतस्करांना पकडून कठोरातील कठोर शिक्षा करायला हवी ! गोतस्करांची बाजू घेणारे अशा घटनांविषयी कधी बोलत नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

गुरुग्राम (हरियाणा) : गोतस्करांचा एक गट तावरू मार्गावरून देहली-गुरुग्राम महामार्गाकडे निघाला होता. पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी तावरू आणि खेर्की दौला येथे सुरक्षा कडे उभारले होते; मात्र एका मिनी ट्रकमधून प्रवास करणार्‍या या तस्करांनी पोलिसांचे कडे तोडून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. पोलिसांना चकवून पळ काढलेल्या ४ सशस्त्र गोतस्करांनी मनेसार, हरियाणा येथील राष्ट्रीय सुरक्षारक्षकांच्या मुख्यालयात प्रवेश केला. या तस्करांनी तेथील कमांडोंवर गोळीबार केला. त्याला कमांडोंनी प्रत्त्युत्तर दिले; मात्र काळोखामुळे तस्कर पळून गेले. या घटनेचे वृत्त कुठल्याच वृत्तसंस्थेने प्रसारित केले नाही; मात्र त्याच कालावधीत अलवर (राजस्थान) येथे एका जमावाच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या पहलू खान याचे वृत्त सर्व वृत्तवाहिन्यांवर बराच काळ झळकत होते. (प्रसारमाध्यमांचा हिंदुद्वेष यातून दिसून येतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

पोलिसांनी तस्करांनी वापरलेला मिनी ट्रक जप्त केला आहे. हा ट्रक मेवात येथील एका रहिवाशाच्या मालकीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. मेवात हा मुसलमानबहुल जिल्हा आहे. पोलिसांना तस्करांविषयी माहिती मिळाली असून त्यांच्या विरोधात गोतस्करीविषयी अनेक तक्रारी यापूर्वीही प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *