पुणे : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ एप्रिल या दिवशी सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानात हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. बैठका, कोपरासभा, भित्तीपत्रके, उद्घोषणा, वैयक्तिक संपर्क आदी माध्यमांच्या जोडीला धर्मसभेचा सामाजिक संकेतस्थळांद्वारेही वेगवान प्रसार केला जात आहे. फेसबूक, व्हॉट्स अॅप, तसेच ट्विटर या माध्यमातून धर्मसभेचा उद्देश सांगणार्या, हिंदुसंघटनाची आवश्यकता प्रतिपादित करणार्या, तसेच धर्मरक्षणासाठी उद्युक्त करणार्या विविध पोस्ट प्रसारीत होत असून समाजातूनही या पोस्टना विशेष प्रतिसाद मिळत आहे. या निमित्ताने सामाजिक संकेतस्थळाच्या प्रसाराचे घोषवाक्य झालेले एकच लक्ष्य : हिंदु राष्ट्र हे ध्येय सर्वांपर्यंत पोचवायचे आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी सांगितले.
सामाजिक संकेतस्थळावरील प्रसाराची काही वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे
१. फेसबूकवरील पुणे हिंदु जनजागृती समिती पानाला प्रतिदिन ५ सहस्र जण भेट देत असून लक्षावधी जणांना धर्मसभेविषयी अवगत करण्यात आले आहे. व्हॉट्स अॅप गटांच्या माध्यमातूनही आतापर्यंत सहस्रो जणांपर्यंत सभेचा विषय पोहोचला आहे.
२. या पोस्ट पाहून नागपूर येथील एका हिंदुत्वनिष्ठाने नागपूरला हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्याची मागणी केली.
३. धर्माभिमानी श्री. कुणाल साठे यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या प्रसारासाठी त्यांनी स्वतः वैशिष्ट्यपूर्ण पोस्ट बनवून परिचितांना पाठवल्या.
४. २५ लक्षांहून अधिक हिंदू फॉलोअर्स असलेल्या फेसबूक गटाच्या मुख्य व्यक्तीने (अॅडमिन) धर्मसभेच्या पोस्ट अप्रूव्ह करून प्रतिदिन एक पोस्ट गटात टाकण्यास प्रारंभ केला आहे.
५. अनेक लोकप्रतिनिधींनीही या सभेचा सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रसार करणार असल्याचे सांगितले आहे.
६. धर्मसभेच्या प्रसारकार्यात सहभागी होऊ इच्छिणार्यांनी ८९८३३३५५१७ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात