Menu Close

मंदिरांवर कारवाई करण्यापेक्षा आधी अनधिकृत बांधकामे तोडा ! – शिवसेना

मुंबई : मंदिरांना नोटिसा बजावून त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा मुंबईतील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात धडक कारवाईची मोहीम उघडावी. ज्या मंदिरांना नोटिसा बजावलेल्या आहेत, ती मंदिरे पदपथांना किंवा वाहतुकीला अडथळा ठरत आहेत का, ते आधी पाहावे. उगाचच सरसकट सर्वच मंदिरांना नोटिसा बजावून लोकांच्या भावना दुखावण्याचे काम प्रशासनाने करू नये, अशी ठाम भूमिका ११ एप्रिलला महापालिकेच्या सभागृहात शिवसेनेने मांडली.

हनुमान जयंतीला पालिका प्रशासनाने पवई येथील हनुमान मंदिराला अनधिकृत ठरवून कारवाईची नोटीस बजावली. त्यामुळे येथील भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत, असे हरकतीचे सूत्र भाजपच्या श्रीनिवास त्रिपाठी यांनी मांडले. या सूत्राला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला.

शिक्षण समितीच्या अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी नोटीस दिलेल्या चारकोप येथील सेक्टर १ च्या दोन साईबाबा मंदिरांवर आणि सेक्टर २ च्या गणपति मंदिरावर पालिकेने बुलडोझर फिरवला, तर चारकोपमधील सर्व रहिवासी रस्त्यावर उतरतील, अशी चेतावणी दिली. शिवसेना नगरसेवक आशिष चेंबूरकर म्हणाले की, लंडनमध्येही भगवान शंकराची मंदिरे आढळतात, मग मुंबईतच मंदिरांवर कारवाई का होते ? मंदिरांमुळे पदपथांना किंवा वाहतुकीला अडथळा होत आहे का, ते तपासून मगच मंदिरांना नोटिसा बजावाव्यात, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार वर्ष २०११ मध्ये पालिकेने मंदिरांना नोटिसा बजावल्या. त्यानंतर आता पुन्हा त्याच मंदिरांना नोटिसा बजावल्या. मग इतकी वर्षे प्रशासन झोपले होते का, असे महापालिकेचे सभागृहनेते यशवंत जाधव यांनी सांगून सभा स्थगित केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *