प्रतिवर्षी शासनाचे गृहमंत्रालय स्वयंसेवी संस्थांमधील विदेशी चलनाचा सहभाग या मथळ्याखाली एक अहवाल प्रसिद्ध करते. त्या अहवालातील पृष्ठ क्र. २० वरील पंधरा सर्वोच्च देणगीदार संस्थांमध्ये आठ ख्रिस्ती आहेत, सात निधर्मी आहेत आणि हिंदु कोणीही नाहीत. त्यांपैकी गोस्पेल फेलोशिप ट्रस्ट इंडिया ही अमेरिकी संस्था मिशनर्यांना साहाय्य करते आणि भारतीय मंत्र्यांना आश्वासन देते की, देवाचे (म्हणजे धर्मांतराचे ! – संकलक, दैनिक सनातन प्रभात) काम करण्यासाठी पारितोषिके विश्वासाने दिलेली आहेत. गॉस्पेल फॉर एशिया ही टेक्सास येथील ख्रिस्ती मिशनर्यांची संस्था आहे. ज्यांनी येशूच्या प्रेमाचा अनुभव घेतलेला नाही, अशा पन्नास लाख खेड्यांपर्यंत आणि २.७ अब्ज लोकांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय आहे. (त्रैमासिक संदेशभारती, जानेवारी-मार्च २००८)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात