‘घरवापसी’ करणार्या संघाचे अभिनंदन ! असे असले, तरी हिंदूंचे धर्मांतरच होऊ नये, त्यासाठी भारतभर धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी संघाने प्रयत्न करावेत, ही अपेक्षा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
रांची : झारखंडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मागील १ मासात अनुमाने ५३ कुटुंबाची ‘घरवापसी’ (धर्मांतरितांना हिंदु धर्मात परत घेणे) केली. हिंदु धर्मात परत आलेले सर्व कुटुंबे सिंदरी पंचायतमधील आहेत. संघाने राज्यातील अरकी गावामध्ये ख्रिस्तीमुक्त तालुका करण्याची मोहीम चालू केली आहे. या अभियानाच्या अंतर्गत लोकांची ‘घरवापसी’ करण्यात येत आहे. हे अभियान पूर्ण मासभर चालणार आहे.
संघाचा आरोप आहे की, ख्रिस्ती मिशनर्यांनी मागील १० वर्षांत हे संपूर्ण क्षेत्र कह्यात घेतले असून लोकांचे धर्मांतर केले आहे. संघाचे संयोजक लक्ष्मणसिंह मुंडा हिंदुस्थान टाइम्सशी बोलतांना म्हणाले, ‘‘याला धर्मांतर म्हणता येत नाही. आम्ही केवळ आमच्या भाऊ-बहिणींना त्यांच्या धर्मात परत आणत आहोत.’’ माहितीनुसार काही दिवसांपूर्वी कोछासिंधारी गावात ७ कुटुंबांचे लोकांनी शुद्धीकरण केले होते. शुद्धीकरणाची प्रक्रिया स्थानिक हिंदु पुजार्याने केली होती. मागील वर्षी राज्यातील अनेक आदिवासींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. याविषयी एका ग्रामसभेत बोलतांना मुख्यमंत्री रघुवर दास यांनी ‘धर्मांतर करणार्या पाद्य्रांना कारागृहात जावे लागेल’, अशी कडक शब्दांत चेतावणीही दिली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात