ठाणे : मारुति म्हणजे भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा त्रिवेणी संगम आहे. जसे आपण मारुतीकडून दास्यभक्ती शिकतो, तशीच वीरताही शिकायला हवी. रावणाने सीतेचे हरण केल्यावर हनुमंताने भक्ती, शक्ती आणि युक्ती यांच्या बळावर सीतेचा शोध लावला अन् लंका जाळून टाकली. आताच्या काळात सगळीकडे रावण आहेत. मग महिलांचे रक्षण कोण करणार ? यासाठी स्वतः धर्माचरणी होऊन शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवायला हवे, असे मार्गदर्शन रणरागिणी शाखेच्या सौ. सुनीता पाटील यांनी केलेे. उत्कर्षा महिला मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रणरागिणी शाखेच्या वतीने कानसई गाव येथील धर्मशिक्षण वर्गाजवळील मारुतीच्या मंदिरातील पालखीचे स्वागत करून औक्षण करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात