कुठे भारतीय संस्कृतीचा चीनमध्ये प्रसार करणारे वृद्ध विद्वान जी एक्सीअॅनलीन आणि कुठे भारतीय संस्कृतीला ‘रानटी’ म्हणून हिणवणारे नतद्रष्ट पुरोगामी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
चीनमधील भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आणि ९७ वर्षीय वृद्ध विद्वान जी एक्सीअॅनलीन यांना भारताने मनमोहन सिंह पंतप्रधान असतांना ‘पद्मभूषण’ देऊन गौरवले. त्यांनी रामायणाच्या संस्कृत श्लोकांचे चिनी पद्यांमध्ये भाषांतर केले होते, तसेच भारतीय परंपरेतील इतर गोष्टींचीही चिनी भाषेत ओळख करून दिली होती. त्यांच्या निमित्ताने प्रथमच एका अभारतीय व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आला. चीनमधील भारतीय संस्कृतीच्या अभ्यासकांचे ते गुरु आहेत. बिजिंग येथील विद्यापिठात भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला जातो.’ (त्रैमासिक संदेशभारती, जानेवारी-मार्च २००८)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात