कौलगे (जिल्हा सांगली) : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत आपण नामजप, तसेच साधनेचे नियमित प्रयत्न करणे आवश्यक असते. जीवनातील सर्व समस्यांवर साधना हेच उत्तर आहे. आयुष्यात ध्येयप्राप्तीसाठी गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना केल्यास आपली जलद प्रगती होते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. गौरी खिलारे यांनी केले. येथे श्रीरामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत हनुमान मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात समितीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.
या मार्गदर्शनाचा लाभ १०० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला. सौ. खिलारे यांनी या मार्गदर्शनात ज्ञानेश्वरीतील काही ओव्यांविषयीही विवेचन केले. मार्गदर्शन झाल्यावर अनेकांनी साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयी जिज्ञासेने प्रश्न विचारले. या वेळी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांची मागणीही करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात