सांगवी (पुणे) येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराला भरभरून प्रतिसाद.
हिंदुत्वाशी नाळ जोडली जाण्यासाठी समाजातील अनेक जण उत्सुक असल्याचा प्रत्यय
पुणे : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूसंघटन व्हावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ एप्रिल या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. खरेतर अनेक साधूसंतांनी भारत पुन्हा विश्वगुरु बनणार, भारतात पुन्हा रामराज्य अवतरणार, वर्ष २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार, असे सांगून ठेवले आहे. हिंदु राष्ट्राच्या निर्मितीचे कार्य ईश्वरसंकल्पित असल्याचा प्रत्यय गावागावांमध्ये सभेचा प्रसार करणार्या समितीच्या कार्यकर्त्यांना येत आहे. गेल्या १५ दिवसांपासून सांगवीजवळील उर्से, शिवणे, बेबडओहोळ, धामणे, बऊर, परंदवाडी, गोडुंब्रे, साळुंब्रे, ओझर्डे आदी १२ गावांमध्ये प्रसार करण्यात येत आहे. त्या ठिकाणी १७ बैठका घेण्यात आल्या असून साधारण २७५ जणांना हिंदु राष्ट्र आणि हिंदु धर्मजागृती सभा यांविषयी अवगत करण्यात आले आहे. गावात कुणाचीही ओळख नसतांना धर्मकार्य आणि हिंदूसंघटनासाठी बैठका आयोजित करत असतांना उत्स्फूर्तपणे बैठकांचे आयोजन होणे, तरुणांचा सकारात्मक प्रतिसाद लाभणे आणि कार्यकर्त्यांनाही धर्मकार्यातील आनंद अनुभवता येणे, अशा घटनांमधून सनातन वैदिक हिंदु धर्माचा प्रसार हे ईश्वरसंकल्पित कार्य आहे. त्यामुळेच हिंदुत्वाशी नाळ जोडली जाण्यासाठी समाजातील अनेक जण उत्सुक असल्याचा प्रत्यय येत आहे, अशी भावना प्रसार करणार्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या गावांमध्ये मिळालेल्या प्रतिसादावरून ६ ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे प्रस्तावित आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात