Menu Close

भारताचा तिरंगा फडकवणा-या पाकिस्तानील कोहलीच्या समर्थकाला होणार दहा वर्षांची शिक्षा !

लाहोर : भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीच्या चाहत्याला घरावर भारताचा झेंडा फडकावल्याप्रकरणी दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. २२ वर्षीय उमर दराजला बुधवारी पंजाबच्या ओकारा प्रांतस्थित जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले. त्याला रिमांडमध्ये पाठवण्यात आल आहे.

दराजला २६ जानेवारीला अटक करण्यात आली होती. याच दिवशी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना भारताने जिंकला होता. यावेळी दराज विजयाचा जल्लोष करताना घरावर भारताचा झेंडा फडकवला होता. याची खबर मिळताच त्याला घरातून अटक करण्यात आली. कोहलीचा समर्थक असल्याने आपणे असे केल्याचे दराजने यावेळी सांगितले.

‘मी विराट कोहलीचा समर्थक आहे. कोहलीसाठी मी भारतीय संघाला समर्थन करतो. कोहलीच्या प्रति प्रेम दर्शविण्यासाठी घरावर तिरंगा फडकावल्याचे’ त्याने सांगितले होते.

स्त्रोत : जी २४ तास


२७ जानेवारी २०१६

तिरंगा फडकाविणाऱ्या पाक नागरिकास अटक

केवळ भारताचा झेंडा फडकावल्याबद्दल एका पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात येते. यातून बोध घेऊन भारतीय शासनानेही भारतात पाकिस्तानी झेंडा फडकावत असलेल्या धर्मांधांवर कडक कारवार्इ करायला हवी, हीच अपेक्षा ! – संपादक, हिंदुजागृती

लाहोर : पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या समर्थकाने भारताच्या विजयानंतर घरावर तिरंगा फडकाविल्याने त्याला अटक करण्यात आली.

पंजाब प्रांतातील ओकारा जिल्ह्यात मंगळवारी ही घटना घडली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारी ट्वेंटी-२० सामना झाला. या सामन्यात विराट कोहलीने ९० धावांची खेळी केल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. अखेर या सामन्यात भारताने ३७ धावांनी विजय मिळविला. या विजयानंतर उमर दराझ या कोहलीच्या समर्थकाने आपल्या घराच्या छतावर जाऊन भारताचा झेंडा फडकावत आनंद साजरा केला. याबाबतची तक्रार देण्यात आल्यानंतर उमरला अटक करण्यात आली. उमर हा कोहलीचा चाहता आहे. 

पोलिस अधिकारी मोहम्मद जमीन यांनी सांगितले, की आम्ही उमरच्या घरावर छापा टाकला असून, भारताचा झेंडा जप्त केला आहे. त्याच्यावर कायदा सुव्यवस्था बिघडविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. त्याच्या घरात कोहलीची अनेक छायाचित्रे सापडली आहेत.

या कारवाईनंतर उमर म्हणाला की, मी कोहलीचा मोठा चाहता आहे. मी फक्त कोहलीसाठी भारतीय संघाला पाठिंबा दिला आणि घरावर तिरंगा फडकाविला. भारतीय क्रिकेटपटूबद्दल मला खूप प्रेम आहे.

संदर्भ : सकाळ

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *