Menu Close

बांगलादेशकडून ३ कुख्यात आतंकवाद्यांना फाशी

आतंकवाद्यांना फाशी देणार्‍या बांगलादेशकडून भारत काही शिकेल का ?

हूजीचा आतंकवादी मुफ्ती अब्दुल हन्नान मध्यभागी

नवी देहली : बांगलादेशने हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामीचा (हूजीचा) आतंकवादी मुफ्ती अब्दुल हन्नान आणि त्याचे २ साथीदार यांना फाशी दिली आहे. वर्ष २००४ मध्ये एका दर्ग्यावर आक्रमण केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या आक्रमणात ३ जण ठार झाले होते आणि ब्रिटनचे उच्चायुक्त घायाळ झाले होते. बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमन खान यांनी सांगितले की, हन्नान याला गाजीपूरच्या कशिमपूर कारागृहात त्याच्या साथीदारांसह फाशी देण्यात आली. रात्री १० वाजून १ मिनिटांनी ही फाशी देण्यात आली. हन्नानचा दुसरा साथीदार देलवार हुसैन रिपोनला सिलहट कारागृहात फाशी दिली गेली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *