Menu Close

हरिहर मंदिरात दर्शनासाठी जाणारे चव्हाणके यांना अटक, तर त्यांच्या शिरच्छेदाची धमकी देणारा इमाम बाबर मोकळा ?

मुंबई : उत्तरप्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील संभल हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. संभल येथे ६८ तीर्थ, १९ स्तूपांसहित हिंदूंचे प्रसिद्ध श्री हरिहर मंदिर आहे; मात्र या भागात अल्पसंख्यांकांचे वर्चस्व वाढल्याने गेली ३५ वर्षे मंदिर बंद ठेवून हिंदूंना पूजाअर्चा आणि दर्शन घेण्यापासून स्थानिक धर्मांध रोखत आहेत. स्वतंत्र भारतात राज्यघटनेने धार्मिक स्वातंत्र्य दिलेले असतांनाही संभलमध्ये हिंदूंना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखणे, हे घटनाविरोधी कृत्य आहे. त्यामुळे या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ‘सुदर्शन न्यूज’ या वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी संभल येथील मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय घोषित केला; मात्र स्थानिक धर्मांध आणि जामा मशिदीचा प्रमुख इमाम इतरत हुसेन बाबर याने श्री. चव्हाणके यांना संभल शहरात पाय ठेवल्यास शिरच्छेद करण्याची धमकी दिली.

अशी धमकावणीची भाषा करणार्‍या धर्मांधांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी मंदिरात दर्शनासाठी जाणारे श्री. चव्हाणके यांनाच अटक करणे हा पोलिसांचा उद्दामपणा आहे. हा एकप्रकारे उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारलाच थेट आव्हान देण्याचा हा प्रकार आहे. हिंदूंच्या घटनात्मक धार्मिक अधिकारांचे रक्षण न करणारे संभलचे हिंदुद्रोही पोलीस अधीक्षक रवीशंकर छवी यांना त्वरित निलंबित करण्यात यावे, तसेच पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणारे इमाम बाबर यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारकडे केली आहे.

इमाम बाबर यांच्या विरोधात ढळढळीत पुरावे असतांनाही पोलीस गप्प का ?

समितीचे प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संभलमध्ये धर्मांधाकडून हिंदूंवर सतत आक्रमणे चालू आहेत. तेथील माजी खासदार शफीकूर रहमान बर्क यांनी हिंदूंना ठार मारण्याची जाहीर धमकी दिली होती; मात्र योगी आदित्यनाथ यांचे शासन आल्यानंतर ३५ वर्षांनंतर पहिल्यांदा श्री हरिहर मंदिरातील शिवपिंडीवर जलाभिषेक झाला. त्यानंतर ‘सुदर्शन न्यूज’चे चव्हाणके यांनी संभलमध्ये जाणार असल्याचे घोषित केल्यावर त्यांना ठार मारण्याची धमकी देणारी इमाम बाबर यांची चित्रफीत https://www.youtube.com/watch?v=6YKv90XGrXA) या सामाजिक संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाली आहे.

यात ‘संपादक श्री. चव्हाणके यांना संभलमध्ये यायचे असल्यास मुसलमान पंथ स्वीकारावा लागेल’, असे सांगून धर्मांतर करण्याचे आवाहन इमाम बाबरने केले आहे. यावरून प्रश्‍न पडतो, ‘आपण भारतात आहोत कि मक्का-मदिनामध्ये ?’ ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. अल्पसंख्यांकांच्या विषयी काही झाले, तरी देशभर काहूर माजवणारे तथाकथित धर्मनिरपेक्षतावाले कुठे गेलेत, असा प्रश्‍न या निमित्ताने पडतो. आतापर्यंत संबंधित इमामावर कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट हिंदुत्वनिष्ठ संपादकालाच अटक केली जाते, याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. योगी आदित्यनाथ सरकारने संभलमधील धर्मांधांची ही मोगलाई कठोर कायदेशीर कारवाई करून मोडून काढावी आणि हिंदूंना त्यांच्या धार्मिक अधिकारांनुसार हरिहर मंदिरात निर्भयपणे पूजा-अर्चा आणि दर्शन करण्याची सोय उपलब्ध करून दिली जावी, अशी मागणी आम्ही करत आहोत, असे समितीने म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *