हिंदुद्वेषाने पछाडलेले पंजाबमधील काँग्रेस शासन ! भविष्यात राज्यातील पशूवधगृहांना विनामूल्य वीजपुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
जालंधर (पंजाब) : राज्यातील गोशाळांना विनामूल्य वीजपुरवठा करण्याची तरतूद असणारी विजेची योजना पंजाबच्या काँग्रेस सरकारने रहित केली आहे. ही योजना मागील अकाली दल आणि भाजप यांच्या युती शासनाने चालू केली होती. काही ठिकाणी विजेचे देयक न भरणार्या गोशाळांची जोडणीही कापण्यात आली आहे. या सदंर्भात राज्याचे उर्जामंत्री राणा गुरजीत सिंह यांनी मात्र या निर्णयाविषयी त्यांना ठाऊक नसल्याचे म्हटले आहे.
पंजाब गोसेवा आयोगचे अध्यक्ष किमतीलाल भगत म्हणाले की, काँग्रेस सरकारला माझी विनंती आहे की, त्यांनी ही योजना चालू ठेवावी. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांच्या वडिलांनी आणि पूर्वजांनी गोसेवेसाठी भूमीच नाही, तर धनही दिले होते. राज्यात ४७२ गोशाळा आहेत. या गोशाळांसाठी वर्षभरात ४ कोटी ५७ लाख रुपयाचे देयक येते. मागच्या सरकारने अर्थसंकल्पातच याची तरतूद केली होती. तरीही आता यांपैकी अर्ध्याअधिकांना विजेचे देयक पाठवण्यात आले आहे, तर ५ गोशाळांची विजेची जोडणी कापण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात