Menu Close

सुरेश चव्हाणके यांना धमकी देणारे इमाम इतरत हुसैन बाबर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उप-जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

डावीकडून श्री. विशाल पटणी, श्री. सतीश सोनार, डॉ. उदय धुरी आणि निवेदन स्वीकारतांना श्री. चंद्रकांत थोरात

मुंबई : उत्तरप्रदेशातील संभलस्थित जामा माशिदीचे प्रमुख इमाम इतरत हुसैन बाबर यांनी सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांना संबलमध्ये येऊ देणार नाही आणि आल्यास शिरच्छेद करण्याची धमकी दिल्याची एक चित्रफीत समोर आली आहे. यासाठी इमाम इतरत हुसैन बाबर यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उपजिल्हाधिकारी यांच्याद्वारे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता वैद्य उदय धुरी, श्री. सतीश सोनार आणि श्री. आेंकार कानडे, तसेच धर्माभिमानी श्री. विशाल पटनी हे उपस्थित होते. मुंबई चे उप-जिल्हाधिकारी श्री. चंद्रकांत थोरात यांनी निवेदन स्वीकारले आणि पुढे पाठवण्याचे आश्‍वासन दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *