Menu Close

राजस्थान राज्यात चालू असलेले धर्मप्रसारकार्य

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा

१ ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या अभियानांतर्गत झालेले विविध उपक्रम

१ अ. जिल्हाधिकार्‍यांना निवेदने देणे : ‘जयपूर आणि पाली या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्याविषयी जागृती करण्याविषयी निवेदने देण्यात आली. अशाच प्रकारचे निवेदन जयपूर येथील पोलीस महानिरीक्षकांनाही देण्यात आले.

१ अा. शिकवणीवर्गात जागृती करणारा लघुपट दाखवणे : सोजत मार्ग येथील एका खाजगी शिकवणीवर्गात सौ. अर्चना लढ्ढा यांनी विद्यार्थ्यांना ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ याविषयी जागृती करणारा लघुपट दाखवला.

१ इ. राष्ट्रध्वजाचा आदर राखण्याविषयी नागरिकांचे प्रबोधन करणे : जोधपूर येथील आशापुरा गृहसंकुल येथे सनातनच्या संत पू. (सौ.) सुशीला मोदी यांनी ध्वजारोहण समारंभानंतर राष्ट्रध्वजाचा आदर राखण्याविषयी उपस्थित १०० नागरिकांचे प्रबोधन केले.

– पू. (सौ.) सुशीला मोदी आणि सौ. शुभ्रा भार्गव, राजस्थान

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *