सनातन धर्माधिष्ठित भारताची महानता !
भारतवर्षातूनच विश्वाचा धर्म निघेल, तो ‘सनातन धर्म’ सर्व धर्मात तसेच विज्ञान आणि दर्शन यांमध्ये समन्वय करील अन् मानवजातीला आंतरात्मिक रूपाने एक बनवील – सॅम्युएल हन्टिंगटन, हॉर्वर्ड विश्वविद्यालय
हॉर्वर्ड विश्वविद्यालयाचे सॅम्युएल हन्टिंगटन लिहितात की, ‘‘६०० वर्षे पारतंत्र्यात राहूनही भारत १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत भौतिक रूपाने सर्वाधिक विकसित देश राहिला आहे. वर्ष १७५० मध्ये भारताचे उत्पादन हे जागतिक उत्पादनाच्या २५ प्रतिशत इतके होते, तर युरोप आणि अमेरिका यांचे एकत्रित उत्पन्नही १८ प्रतिशतहून अल्प होते; पण वर्ष १९०० पर्यंत म्हणजे ब्रिटीश शासनाच्या १५० वर्षांनंतर भारताचे उत्पादन घटून २ प्रतिशतपेक्षाही अल्प झाले होते. तर अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांचे एकत्रित उत्पन्न वाढून ते जागतिक उत्पादनाच्या ८४ प्रतिशत इतके झाले होते.
ते पुढे लिहितात की, पाश्चिमात्त्य देशांची ही औद्योगिक क्रांती अधीनस्थ राष्ट्रांचे औद्योगिक विघटन करून करण्यात आली. ब्रिटीश शासनाच्या पहिल्या १२५ वर्षांच्या कालावधीत ३ कोटी भारतीय (एकूण लोकसंख्येच्या १० प्रतिशतहून अधिक) उपासमारीमुळे मृत्यूमुखी पडले. त्याच कालखंडात भारतातून ग्रेट ब्रिटनमध्ये होणारी गहू आणि तांदूळ यांची निर्यात जवळजवळ २५ पटीने वाढली होती. तरीही आम्ही नष्ट झालो नाही, संपलो नाही; कारण ‘‘भारत नष्ट होऊ शकत नाही. आमची जात संपू शकत नाही; कारण मानवजातीच्या भविष्यासाठी ते अतिशय आवश्यक आहे आणि त्याला सर्वांत उच्च आणि महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडण्यासाठी निवडले गेले आहे. भारतवर्षातूनच विश्वाचा धर्म निघेल, तो ‘सनातन धर्म’ सर्व धर्मात तसेच विज्ञान आणि दर्शन यांमध्ये समन्वय करील आणि मानवजातीला आंतरात्मिक रूपाने एक बनवील.’’
(संदर्भ : एम्. नाडकर्णी, इंडियाज स्पिरिच्युल डेस्टिनी, श्री ऑरोबिंदो सोसायटी, पुड्डुचेरी, पृष्ठ ३२; ‘कम्प्लीट वर्क्स ऑफ श्री ऑरोबिंदो ६’, पृष्ठ ८४)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात