‘सुदर्शन’ वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांच्या अन्याय्य अटकेचे प्रकरण
श्री. सुरेश चव्हाणके हे धार्मिक संस्कार असलेले प्रखर राष्ट्रभक्त संपादक आहेत. त्यांचे आतापर्यंतचे एकही वक्तव्य देशविरोधी नाही. असे असतांना श्री. चव्हाणके यांना अन्याय्य पद्धतीने झालेली अटक संतापजनक आहे. या विरोधात सर्व साधूसंत, वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. ‘देशभक्तांना कारागृह (जेल) आणि देशद्रोह्यांना जामीन (बेल)’ अशी आजची स्थिती आहे. तुघलकी फर्मान काढून श्री. चव्हाणके यांना अटक करणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे.
आज चव्हाणके यांचे शिर कापण्याची आणि त्यांचे हात-पाय तोडण्याची भाषा करणारे धर्मांध मोकाट आहेत; मात्र पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू, साध्वी प्रज्ञासिंह, श्री. धनंजय देसाई आणि आता श्री. सुरेश चव्हाणके यांच्यासारखे संत अन् राष्ट्रप्रेमी व्यक्ती यांना कारागृहात डांबले जात आहे. सनातन वैदिक हिंदु धर्माचे प्रतिनिधित्व करणार्या व्यक्तीचा पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्यात अशा प्रकारे छळ होणे दुर्दैवी आहे. सरकारने निर्दोष चव्हाणके यांची त्वरित मुक्तता करावी अन्यथा भारतभर निदर्शने करण्यात येतील.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात