Menu Close

बांगलादेशात धर्मांधांकडून एका मुसलमान मॉडेलची हत्या

धर्मांध स्वधर्माच्या परंपरांच्या विरोधात वागणार्‍यांना ठार करतात, तरीही त्यांच्या धर्माला शांतीचा धर्म असे म्हटले जाते ! -संपादक, दैनिक सनातन प्रभात

राऊधा अतिफ

ढाका : मूळची मालदीव येथील असलेल्या राऊधा अतिफ या २० वर्षांच्या तरुणीची मुसलमान धर्मांधांनी हत्या केली आहे, असा आरोप तिचा भाऊ रय्यान आतिफ याने केला आहे.

२९ मार्च या दिवशी तिचा मृतदेह बांगलादेशमधील ती शिकत असलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थीगृहात आढळून आला होता. स्थानिक पोलिसांनी राउधा हिने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला होता; मात्र राऊधाच्या भावाने ही शक्यता फेटाळून लावली आहे. इस्लामी बँक वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेली राऊधा ही मॉडेल होती. ती मुसलमान धर्मांधांना अपेक्षित पोशाख परिधान करत नसल्याने तिची हत्या करण्यात आली, असा आरोप आतिफ याने केला आहे. राऊधाने ‘व्होग’ या मासिकासाठी स्वतःची छायाचित्रे काढली होती. ‘व्होग’च्या मुखपृष्ठावर इतर मॉडेलसमवेत तिचेही छायाचित्र झळकले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *