हिंदु पोलिसांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालणारे कर्नाटकातील काँग्रेसच्या राज्यातील हिंदुद्वेष्टे पोलीस अधिकारी ! –
बेंगळुरू (कर्नाटक) : शहर सशस्त्र राखीव पोलीसदलाचे पोलीस आयुक्त किशोर बाबू यांनी ११ एप्रिल या दिवशी हिंदूविरोधी आदेश काढत पोलिसांना कपाळावर विभूती आणि टिळा लावण्यावर, तसेच हातात पवित्र दोरे बांधण्यावर बंदी घातली आहे. (हिंदुद्वेषी काँग्रेस शासन सत्तेवर असलेल्या कर्नाटकातील पोलिसांकडून आणखी वेगळी अपेक्षा काय करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
बाबू यांना वाटते की, पोलिसांच्या अशा कृती कायद्याच्या विरोधात आहेत, तसेच बाबू यांनी ‘महिला पोलिसांनी कानात दागिने घालणे आणि हातात बांगड्या घालणे पोलीस नियमांच्या विरोधात आहे’, असा शोध लावला आहे. ‘या कृतींमुळे धार्मिकतेला खतपाणी मिळते’, असा बाबू यांचा दावा आहे; मात्र हे नियम अन्य धर्मीय पोलिसांना लावलेले नाहीत. जे मुसलमान पोलीस दाढी वाढवून कामाच्या वेळांत नमाजासाठी जातात अथवा जे ख्रिस्ती गळ्यात क्रॉस घालतात त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाईल, हे आदेशात स्पष्ट केले नाही. (एकतर पोलिसांचे हे नियम अर्ध्या रात्री सिद्ध झालेले नाहीत. या नियमांची आठवण बाबू यांना आताच कशी झाली ? पोलीस नियम केवळ हिंदूंनाच लागू करावे, असे प्रावधान आहे काय ? कपाळावर विभूती आणि टिळा लावल्याने, तसेच हातात पवित्र दोरे बांधल्याने, बांगड्या अन् दागिने घातल्याने धार्मिकतावाद कसा भडकतो ? या कृती न केल्याने तो अल्प करता येतो, यावर संशोधन केले गेले आहे काय ? काँग्रेस सरकारच्या काळात हिंदूंची गळचेपी करण्यात येत आहे, हे या आदेशाने उघड झाले आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात