Menu Close

नंदुरबार येथे हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा बैठकीद्वारे निर्धार !

बैठकीत उत्स्फूर्त प्रतिसाद देतांना धर्माभिमानी

नंदुरबार : येथे ३० एप्रिलला होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या आयोजनाविषयी चर्चा करण्यासाठी विविध हिंदुप्रेमी संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत धर्मजागृती सभा यशस्वी करण्याचा आणि त्यासाठी व्यापक संपर्क अभियान करण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी केला.

१. बैठकीत व्यापक प्रसार करणे, प्रत्येक संघटनेने कार्यरत होणे, कोपरा सभांचे आयोजन करणे याविषयी निर्णय घेण्यात आले.

२. ज्येष्ठ पत्रकार आणि हिंदुप्रेमी कार्यकर्ते चंद्रशेखर बेहरे, पतंजली योग वेदांत सेवा समितीचे एन्.डी. माळी, भारत स्वाभिमान न्यासाचे नवनीत शिंदे, युवा सेनेचे शहरप्रमुख पंकज चौधरी, योग वेदांत सेवा समितीचे विठ्ठल मगरे, विश्‍व हिंदु परिषदेचे दिलीप ढाकणे पाटील, संत दगा महाराज भक्त परिवाराचे मोहनकाका जैन, बंजारा समाजाचे ज्ञानेश्‍वर बंजारा, अरिहंत गोशाळेचे महेंद्र जैन, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, अखिल भारतीय श्री राणा राजपूत संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र राजपूत आदी मान्यवरांसह विविध व्यायामशाळा, तालीम मंडळाचे आणि गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, समाज संघटनांचे पदाधिकारी, धर्मप्रेमी बांधव, सर्व हिंदु प्रेमी पक्ष, संघटना, मंडळ, पंथ आणि संस्था यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *