Menu Close

राजस्थानात वायुसेनेने पाडलेला बलून आला होता पाकिस्तानातून : पर्रिकर

असे प्रकार परत होऊच नयेत यासाठी भारत सरकारने आवश्यक अशी कृती करावी हीच अपेक्षा. – संपादक, हिंदुजागृती

बाडमेरच्या मोखाबमध्ये बुधवारी लष्कराने आणखी एक फुगा पाडला. त्याची तपासणी करणारे पोलिस.
जयपूर/नवी दिल्ली : राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात मोखाब परिसरात बुधवारीदेखिल एक संशयास्पद फुगा (बलून) उडताना आढळून आला. एअरफोर्सच्या एका फायटर प्लेनने हा बलून खाली पाडला.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत बलून ताब्यात घेतला असून तो एअरफोर्सच्या ताब्यात दिला आहे. या दरम्यान दिल्लीच्या इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळही बुधवारी एक संशयास्पद बलून आढळला होता. तसेच मंगळवारी बाडमेर आणि पाली जिल्ह्यांमध्ये पाडलेल्या संशयास्पद बलूनबाबत बोलताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी हे बलून पाकिस्तानातून आले होते, असे सांगितले. विशेष म्हणजे सुखोई विमानांचा वापर करून हा बलून पाडण्यात आला.

संशयास्पद साहित्य मिळाल्याच्या वृत्ताला लष्कराने दिला होता दुजोरा

– सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सापडलेल्या बलूनवर यूएसए असे लिहिलेले आहे. मात्र त्याबाबत लष्कराचे अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत.
– आज आणि मंगळवारी आढळलेले बलून हे तीन मीटर रूंद आणि आठ फूट लांबीचे असल्याचे सांगितले जात आहे.

गुडगावकडून दिल्लीकडे आला बलून

– बुधवारी सायंकाळी दिल्लीच्या IGI एअरपोर्टजवळ आयानगर परिसरात बलून आढळून आला.
– हा बलून गुडगावकडून आला होता, असे सांगण्यात आले आहे.
– बलून पाहिल्यानंतर सेक्युरिटी एजन्सींना अलर्ट करण्यात आले आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *