जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
नवी देहली : कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्या ही प्रभु श्रीराम यांची जन्मभूमी आहे. हा निर्णय वर्ष २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. असे असतांनाही अद्याप या पवित्र भूमीत हिंदूंना पूजा करण्याची अनुमती देण्यात आलेली नाही. मागील १५ वर्षांत उत्तरप्रदेशात हिंदुविरोधी पक्षांची राजवट असल्यानेे येथे हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार मिळाला नव्हता; परंतु आता केंद्र आणि राज्य या दोन्ही ठिकाणी भाजपचे बहुमत असलेली सरकारे आहेत. त्यामुळे आता श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी १५ एप्रिल या दिवशी जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन केले. या आंदोलनामध्ये बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वाल्मीकि समाज, हिंदु संहति, हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा, सनातन संस्था आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनात करण्यात आलेल्या इतर मागण्या
१. देशात अवैध स्वरूपात घुसलेल्या रोहिंग्या मुसलमानांना तात्काळ देशाच्या बाहेर हाकलावे.
२. भारतीय निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना त्वरित मुक्त करून पाकला ‘जशास तसे’ उत्तर देण्यात यावे.
३. अंदमान-निकोबार बेटासह देशभरातील शहरे, सभागृह, मार्ग, स्थानके आदींना देण्यात आलेले विदेशी नावे पालटून मूळ भारतीय नावे द्यावीत.
४. बोधन (तेलंगण) येथील इंद्रनारायण मंदिरारवर बलपूर्वक अधिकार निर्माण करून बनवण्यात आलेल्या ‘देवल मशीद’ला पुरातत्व विभागाने पुन्हा हिंदु मंदिर घोषित करावे.
क्षणचित्र : आंदोलनाच्या स्थळी भारद्वाज पक्षी आणि गरुड आले होते. त्यामुळे ‘या आंदोलनाला साक्षात श्रीविष्णूचा आशीर्वाद प्राप्त झाला’, असे अनेक आंदोलकांना वाटले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात