Menu Close

हिंदु धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

‘ज्ञानगंगा आली अंगणी’ या व्याख्यानमालेचे चौथे विचारपुष्प ‘तीन पिढ्यांचे योगदान’

डावीकडून वैद्य परिक्षित शेवडे, डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

डोंबिवली : हिंदु धर्माच्या विचारांचा चुकीचा प्रसार होत आहे, हे पाहून मला खंत वाटली आणि धर्मजागृतीचे कार्य करायचे, असा निश्‍चय केला. वर्ष १९७६ पासून पूर्णवेळ कीर्तन आणि प्रवचन यांच्या माध्यमातून हिंदु धर्माची महती केवळ हिंदु समाजालाच नव्हे, तर विदेशातील लोकांनाही कळावी, यासाठी धर्माचा जागर करण्यास आरंभ केला. हिंदु धर्म विज्ञानाच्या आधारभूत पायावर स्थिर असल्याने तो जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे, असे प्रतिपादन भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांनी केले. येथे १३ एप्रिल या दिवशी झालेल्या पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शनाच्या अंतर्गत ‘ज्ञानगंगा आली अंगणी’ या व्याख्यानमालेचे चौथे विचारपुष्प ‘तीन पिढ्यांचे योगदान’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी त्यांचे पुत्र डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि नातू डॉ. परिक्षित शेवडे यांनीही त्यांचे विचार मांडले. भारताचार्य सु.ग. शेवडे हे ८२ वर्षांचे आहेत. त्यांनी देशविदेशांत १ सहस्र २५० व्याख्याने, तसेच १४ पुस्तकांचे लेखनही केले आहे.

सु.ग. शेवडे पुढे म्हणाले, ‘‘वर्ष १९८० मध्ये अमेरिकेतील जागतिक धर्म परिषदेमध्ये माझी निवड झाली होती. तेव्हा पासपोर्ट, व्हिसा, विमान तिकीट आणि पैसे यांची व्यवस्था केवळ आठ दिवसांत झाली. याला मी देवाची कृपा समजतो.’’ डॉ. सच्चिदानंद शेवडे म्हणाले, ‘‘पूर्वी मी अधिकोषात नोकरी करत होतो. वडिलांच्या अभ्यासाचे बारकाईने निरीक्षण करतांना अधिकोषात आकडेमोड करण्याऐवजी आपणही या क्षेत्रात ज्ञानदान करावे, यासाठी स्वसंमतीने मी नोकरी सोडली.

राष्ट्रभक्तांची जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा, त्यांचे कर्तृत्व, त्याग यांची जाणीव व्याख्यानांतून देश-विदेशातील लोकांना करून दिली. हिंदुत्वनिष्ठ माझ्या वडिलांना जीवन गौरव पुरस्कार देण्यास सिद्ध नाहीत; मात्र साम्यवादी, समाजवादी लोकांना पुरस्कार दिला जातो.’’ तिसर्‍या पिढीचे वैद्य परिक्षित शेवडे म्हणाले, ‘‘बाबा आणि आजोबा यांच्या व्याख्यानांचा मी लहानपणापासून अभ्यास केला आहे. ‘तुमचे डोळे आभाळाला लागले पाहिजेत; पण पाय भूमीवरच हवेत’, हा मंत्र मी लक्षात ठेवला आहे.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *